पिंक रिक्षा चालक कष्टकरी महिलांना मिळाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
चिंचवड ऑटो क्लस्टर येथील आंतरराष्ट्रीय ऑटो परिषदेत 100 ऑटो रिक्षा चालक महिलांचा सन्मान


– महिलांच्या पुढाकाराने ऑटो मोबिलिटी क्षेत्रात जगभर प्रबोधन करणार : डॉ. एस. के. सरोज


पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार : आशा कांबळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्य व पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष सौ आशा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वेहिकल ऑटो एक्जीबिशन 2025 सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या. या वेळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महिलांनी सुरुवातीला पिंक रिक्षाचे रॅली आयोजित केली, पिंपरी ते ऑटो कस्टर पर्यन्त हि पिंक रिक्षा रैली काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिका येथून जिम बँनसोन, जर्मनी येथुन क्रिस्तोफ स्प्रिंग,तसेच इंग्लंड, दुबई, जपान, व्हिएतनाम सह, दिल्ली राजस्थान, पंजाब, गुजरात, चेन्नई हैदराबादसह देशभरातील व प्रदेशातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक, टेम्पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय कष्टकऱ्यांचे नेते अध्यक्ष बाबा कांबळे, इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल के चेअरमन डॉ. एस. के. सरोज, अध्यक्ष डॉ.राजीव मिश्रा, डॉ दीपक वाधवा, श्रीनिवास कुमार, MSME केंद्र सरकार लघुउद्यो विभागाचे के.के.गोयल, डॉ कल्याण हट्टी, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, चंद्रकांत बराटे, संजय चव्हाण,आदी यावेळी उपस्थित होते.
इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल या संघटनेचे चेअरमन डॉ. एस. के. सरोज म्हणाले की, ऑटोचा इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांच्या पुढाकाराने पुढे कार्य सुरू ठेवणार आहे. केंद्र शासनाने महिलांना इलेक्ट्रिक व्हेहिकलसाठी अनुदान द्यावे यासाठी केंद्र पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरवठा करू असे डॉ सरोज म्हणाले,
आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काबाडकष्ट करणाऱ्या तसेच अत्यंत दुर्बल घटकातील 100 महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढून त्यांना शंभर रिक्षा देण्याचा उपक्रम घरकाम महिला सभा आणि बाबा सामाजिक फाउंडेशन या संयुक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याला चार वर्षापेक्षा अधिक काळ होत आहे. कोविड काळामुळे ही योजना मध्यंतरी बंद होती. परंतु आता नव्याने पुन्हा ही योजना सुरू करून पिंपरी चिंचवड पुणे शहरातील एक हजार महिलांना पिंक रिक्षा योजनेमध्ये सहभागी करून त्यांना पिंक रिक्षा योजनेमध्ये स्वावलंबित करणार असल्याचे आशा कांबळे म्हणाल्या. ही योजना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र भरून नंतर देशभर वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मधुरा डांगे-( कष्टकरी कामगार पंचायत सरचिटणीस),ममता मनुरकर -( पिंपरी चिंचवड महापालिका नगरसदस्य,) सरोजा कुचेकर – (टपरी पथारी हातगाडी पंचायत महीला शहर अध्यक्ष,) कल्पना घाडगे-( टपरी पथारी हातगाडी पंचायत महिला उपाध्यक्ष,) एडवोकेट काजल कांबळे, यमुना काटकर, संगीता कांबळे, रेखा भालेराव, मनीषा माने, सारिका गलपलू,योगिता शिंदे, राणी तांगडे, वैशाली सोनवणे, आधी पिंक रिक्षा चालक महिला सहभागी झाल्या होत्या
EV TECH INDIE EXPO वतिने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कंपनीचे डायरेक्टर मुकेश यादव, गणेश महाले, सतीश मांडोले, यांनी हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवला. या कार्यक्रमात चाकण हिंजवडी सह महाराष्ट्रातील उद्योजक, लघुउद्योग संघटनेचे प्रतिनिधी तसेच कंपनीचे डायरेक्टर व सी ओ आदी मान्यवर उपस्थित होते.
– आशा बाबा कांबळे, अध्यक्षा, पिंक रिक्षा संघटना तथा सदस्य पिंपरी चिंचवड फेरीवाला समिती
–










