जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांचा विशेष सन्मान
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी देखील जागतिक महिला दिनानिमित्त संदेशाद्वारे शहरातील महिला भगिनींना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या


समाज विकास विभागाच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅड.गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्या उषा मुंढे,अनुराधा गोरखे,अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला मोठ्या उपस्थित होत्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅड.गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या मातीला महिलांच्या शौर्याचा मोठा इतिहास आहे. स्वराज्य निर्माणाची छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आपला ठसा उमटवला. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अनमोल आहे,’ असे सांगतानाच लोखंडे पुढे म्हणाले, ‘आपल्या घरतील महिला घऱातील प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श असते. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर महापुरुषांनी महिला सक्षमीकरणासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य खूपच मोठे आहे,’ असेही ते म्हणाले.
१४. आशा महिला बचत गट
१५. जिजाऊ महिला बचत गट
१६. वैशाली काळभोर महिला बचत गट
१७. समता महिला बचत गट
१८. कष्टकरी महिला बचत गट
१९. महिला आधार बचत गट










