Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत एक दिवशीय कराटे प्रात्यक्षिक व महिला हक्क व संरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.       प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास,  व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने  कराटेचे प्रात्यक्षिके व प्रशिक्षण तसेच महिला हक्क संरक्षण विषयक कार्यशाळा  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे व दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून देणे हा होता.         कमला एज्युकेशन सोसायटीच्या  अध्यक्षा  प्रतिभा शहा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे तब्बल चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. विशेष म्हणजे या सभेत महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सलग १४ तास जोरदार चर्चा झाली. त्यामुळे ही सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली. सभेचे कामकाज सकाळपासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालले. विविध पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर सखोल चर्चा करत प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील प्रलंबित कामे, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच विकास प्रकल्प यावर सदस्यांनी आपापली मते मांडली. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समारोपाच्या भाषणाने सभेची सांगता झाली. त्यांनी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत पुढील नियोजनात त्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.…

Read More

पिंपरी चिंचवड, हिंजवडीसह पश्चिम पुण्याची कोंडी फुटणार नवले पूलापासून जोडणारा १५.८७ किलोमीटरचा प्रकल्प प्रस्तावित; वाहतूक नियोजनाला बुस्टर पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवले पुलाला जोडणारा देहूरोड ते सुतारवाडी असा सुमारे १५.८७ किलोमीटर लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड, हिंजवडी आयटी पार्कसह लगतच्या उपनगरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मंगळवारी पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या सद्यस्थिती बाबत सभागृहात प्रश्न विचारण्यात आला होता. या अनुषंगाने आमदार शंकर जगताप यांनी नवले ब्रिज…

Read More

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या आंदोलनाला यश – काशिनाथ नखाते पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत १२ तास कामाचे प्रस्तावित विधेयक अखेर मागे घेण्यात आले असून या निर्णयाचे राज्यभर स्वागत करण्यात येत आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने कामाच्या तासवाडीला तीव्र विरोध करत आंदोलन केले होते अखेर सरकारने हा निर्णय घेतला कामगारांनी या निर्णयाचा आनंद साजरा करत साखर वाटून स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने दुकाने, खाजगी आस्थापना आणि कारखान्यांमधील कामाचे तास वाढवण्यास मंजुरी दिल्यानंतर कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे याला तीव्र विरोध करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड आणि मुंबई येथे आंदोलन तसेच निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. अखेर कामगार मंत्री आकाश फुंडकर…

Read More

नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शुभेच्छा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्याने रूजू झालेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने त्यांचा सभागृहाला परिचय करून देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून यशस्वी कामकाज करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी त्यांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या विशेष सभेला…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) मध्ये “झिंग २०२६” महाविद्यालय अंतर्गत स्पर्धाचे शुक्रवारी आणि शनिवारी (२७ मार्च ते २८ मार्च) आयोजन करण्यात आले आहे.     यावेळी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीआयएम संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित राहणार आहेत.    या कार्यक्रमात आयपीएल ऑक्शन, द स्टार्टअप रेस (बिझनेस प्लॅन), सुपर शॉट्स, द सीएक्सओ चॅलेंज (जनरल मॅनेजमेंट / स्ट्रॅटेजी), बॅटल ऑफ ब्रँड, लीडर लिजेंड्स, माय…

Read More

झिरो वेस्ट स्लम उपक्रमांतर्गत २४ दिवसांमध्ये ९१६ टन कचऱ्याचे करण्यात आले सुरक्षित व्यवस्थापन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा येथील ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत आहे. या उपक्रमांतर्गत १ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२६ या काळात तब्बल ९१६ टन कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,  सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली दापोडी व गवळीमाथा येथे राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो वेस्ट स्लम’…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही स्थायी समितीने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २२ नवीन प्रकल्पांचा समावेश करत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन आयुक्तांनी केवळ सुरू असलेल्या कामांवर भर देत नवीन प्रकल्प टाळले असताना स्थायी समितीने स्वतःच्या उपसूचनांद्वारे हे प्रकल्प समाविष्ट केले आहेत. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादर केलेला मूळ अर्थसंकल्प ५,६५५ कोटी ७३ लाख रुपयांचा होता. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह तो ९,३२२ कोटी १७ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. मात्र, नवीन विकासकामांसाठी केवळ २०० कोटींची तरतूद असल्याने स्थायी समितीने त्यात बदल करत सुमारे ४०० कोटींच्या २०० उपसूचना मंजूर केल्या. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे…

Read More

पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावर सभागृहात जोरदार खडाजंगी; मोठे प्रकल्प थांबवा, मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची सर्वपक्षीय मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर भर द्यावा, मोठ्या खर्चिक प्रकल्पांना आळा घालावा आणि नागरिकांना पाणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने केली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा झाली. भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी चर्चेची सुरुवात करत  सव्वा तास भाषण करत प्रशासनावर टीका केली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल ९३२२.१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. स्थायी समितीमार्फत सादर करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात ४१४.२२ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून, शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा अर्थसंकल्प महापौर रवी लांडगे यांच्याकडे सादर केला. मंगळवारी (दि.२४) झालेल्या सभेत यास मंजुरी देण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध स्रोतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी विभागातून २५८ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित असून, ‘ना…

Read More