Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या अलीकडील अतिक्रमण कारवाईवर गंभीर पक्षपाताचे आरोप होत आहेत. सामाजिक संस्था, ज्यांचा उद्देश लोकहिताचा असून, विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या या संस्थांना महानगरपालिकेच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, राजकीय नेत्यांच्या फ्लेक्स आणि बॅनरबाजीकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. सामाजिक संस्थांना त्रास, राजकीय बॅनरवर डोळेझाक पिंपळे सौदागर परिसरात अतिक्रमण विरोधी पथक नियमितपणे कारवाई करत असते. या कारवाया करताना सामाजिक संस्था लावलेल्या छोट्या सूचना फलकांवर तात्काळ कारवाई केली जाते, त्यांना नोटीसा पाठवल्या जातात, फलक काढून टाकले जातात किंवा दंड आकारला जातो. परंतु त्याच भागात…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आळंदी हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथिल पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जल प्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्यां जैसे थे आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून थेट रसायन व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली. यात केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीत जलपर्णी ची समस्यां देखील कायम असून आळंदीत सुरु होत असलेल्या हरिनाम सप्ताहाचे अनुषंगाने प्रभावी स्वच्छता, उपाय योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (७५० वा) सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अलंकापुरीत उत्साही मंगलमय, धार्मिक, भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायास साजेसा अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते हरिनाम गजरात झाला. हजारो वारकरी, भाविकांनी प्रतिसाद देत सोहळ्यात सहभागी झाले. आळंदीतील या सोहळ्यास भल्या पहाटे उद्घाटनास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डॉ. नारायण महाराज जाधव, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, आमदार बापूसाहेब पठारे, मुक्ताईनगर देवस्थानचे प्रमुख रवींद्र भैय्या पाटील, पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे,…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटन दिनी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील घरा घरात मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथवाटप करणार असल्याची माहिती देत मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “घरात बसणाऱ्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासोबत जाणे हेच योग्य ठरतं. त्यांचं संतविचारांवर निष्ठा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ( हडपसर ) जोधपूर पुणे दैनदिन रेल्वेला मान्यता रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली .आज दि .३ में रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला . चिंचवड प्रवासी संधाने ही एक्स्प्रेसगाडी दैनदीन चालू व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले . लेखी निवेदने रेल्वे मंत्री , मध्य रेल्वेचे जी. एम., डी आर एम , आदी ना वेळोवेळी दिले . प्रथम सप्ताहात एक दिवस , नंतर तीन दिवस व आता दैनदिन थांबा चिंचवड रेल्वे स्थानकावर येता -जाता मिळाला आहे . या थांब्यामुळे शहरातील राजस्थानी समाज बांधव , वसई रोड , सुरत , अहमदाबाद…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात सोसायट्यांना कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा पाण्याचा तुटवडा भासत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी बैठक घेत प्रशासनाला चांगलेच सुनावले. पाण्याची गळती आणि अपव्यय रोखून नागरिकांना त्वरित समाधानकारक पाणीपुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांना सध्या निर्धारित कोट्यापेक्षा कमी पाणी मिळत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडगावात पाण्याच्या टाकी खाली महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जगताप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पाण्याची गळती, गैरवापर व अपव्ययाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड प्राधिकरण मंडलाच्यावतीने केंद्र सरकारने जातीविहाय जनगणना करण्याचा निर्णय केला. त्याबद्दल जयदीप खापरे (मंडळ अध्यक्ष) यांनी आनंद उत्सव करण्याचा कार्यक्रम मंडळाने घेतला आहे. १ मे २०२५ रोजी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. देशामध्ये १९३१ साली इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली होती .त्यानंतर प्रथमच मोदी सरकारने निर्णय घेतला ज्या काँग्रेसला ७० वर्षांमध्ये जमले नाही त्यांनी चुकीचे म्हणणे सांगून दिशाभूल करू नये. जातीनिहाय जनगणना केल्या छोट्या व शोषित विकास बाजूला पडलेल्या समाजाचा विकास होईल. त्यामुळे देशाची प्रगती होईल त्या समाजाच्या लोकसंख्येच्या विकास होईल. त्याबद्दल मोदी सरकारचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. ऍड. वर्षा डहाळे, आ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मनपा ने कोट्यावधी रुपये खर्च करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात प्रशस्त फुटपाथ बनवलेले आहेत.मनपाने फुटपाथ सुस्थितीत ठेवावेत, अशी  मागणी जागृत नागरिक महासंघाने शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुटपाथ वरून चालणे हा पादचाऱ्यांचा प्रथम अधिकार आहे व फुटपाथ सुस्थितीत ठेवणे मनपाची जबाबदारी आहे.तथापि सदर फूटपाथ अनेक वेळा वेगवेगळ्या कामासाठी उदा. पाणी पाईपलाईन इलेक्ट्रिक केबल ड्रेनेज लाईन वगैरे साठी फोडले जातात पण काम पूर्ण झाल्यानंतर ते मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी मात्र पार पाडली जात नाही त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकाराच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी एनजीओ आहे हे करत असताना संस्था सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत असते. नुकतेच मावळ मधील ताजे ग्रुप ग्रामपंचायत भागात राहणाऱ्या गोरगरीब व गरजू 18 कातकरी आदिवासी कुटुंबांना संस्थेने किराणा साहित्याचे वाटप केले. गोरगरिबांच्या आयुष्यात काही क्षण सुखाचे व आनंदाचे पेरल्याचा संस्थेला अभिमान आहे. यावेळी ताजे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ताईबाई हिरामण केदारी तसेच उपसरपंच रेश्मा गणेश गायकवाड व इतर सदस्य व ग्रामस्थ तसेच जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सणस, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, खजिनदार…

Read More

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या त्यामुळे गुन्हेगारीच प्रमाण वाढलं , भांडण, मारा – मारी,चोरी , छेडछाड या सारख्या अनेक गोष्टीमुळे पिंपळे निलख वासिय त्रस्त झाले होते. आणि हेच हेरून इथे पोलीस चौकी व्हावी असा निर्धार रविराज काळे यांनी केला पण प्रशासनाची उदासीनता आडवी येत होती पण अखेर रविराज काळे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आणि पोलिस चौकी होण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. या वेळी रविराज काळे म्हणाले हे यश माझं नाही तर सामान्य नागरिकांचं आहे ज्या ज्या वेळी तुमच्या हक्काचा प्रश्न येईल त्या त्या वेळी मी रस्त्यावर उतरेन ही…

Read More