चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

पुणे जोधपुर पुणे एक्सप्रेसचे चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड येथे स्वागत

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ( हडपसर ) जोधपूर पुणे दैनदिन रेल्वेला मान्यता रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली .आज दि .३ में रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला .

चिंचवड प्रवासी संधाने ही एक्स्प्रेसगाडी दैनदीन चालू व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले . लेखी निवेदने रेल्वे मंत्री , मध्य रेल्वेचे जी. एम., डी आर एम , आदी ना वेळोवेळी दिले . प्रथम सप्ताहात एक दिवस , नंतर तीन दिवस व आता दैनदिन थांबा चिंचवड रेल्वे स्थानकावर येता -जाता मिळाला आहे . या थांब्यामुळे शहरातील राजस्थानी समाज बांधव , वसई रोड , सुरत , अहमदाबाद , आदी ठिकाणी जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या प्रवासीयांची सोय होणार आहे . यासाठी रेल्वे मंत्री , रेल्वे प्रशासन , मावळचे खासदार श्रीरंग बारणे तसेच राजस्थानी समाज बांधवानी देखील अथक परिश्रम घेतले आहे . त्याचे चिंचवड प्रवासी संघ आभारी आहे .

आज सायंकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर आगमन झाले . तेथे इंजिनाला हार स्थानक प्रमुख शोभा वर्मा समवेत चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार ,पदाधिकारी मनोहर जेठवानी, मुकेश चुडासमा यांच्या हस्ते हार घालण्यात आला व शमशुद्दीन भालदार , नंदू भोगले ,मनोज चौगुले, आत्मप्रकाश मटाई, पं. हरेश शर्मा, राजस्थान समाज बांधवांचे प्रमुख हरीश वर्मा , मालाराम माळी समवेत आदींनी घोषणा देत प्रवाशांना पेढे, लाडू वाटून एक्सप्रेस चे स्वागत करण्यात आले . यावेळी चिंचवड रेल्वे स्थानकावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सरवदे, दत्ता इंदीलवार , रेल्वे तिकीट तपासणीस लता दुधाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार यांनी रेल्वे मंत्री तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे रेल्वे अधिकारी यांचे अभिनंदन केले व आभार मानले. मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस तसेच बारामती कर्जत पॅसेंजर, पुणे लोणावळा दरम्यान एक लोकल दुपारची बंद केली आहे. कोरोना काळापासून बंद केली त्या सर्व सुरू करण्यात याव्यात.

पिंपरी चिंचवड शहरात तसेच तळेगाव परिसरात सातारा, कराड ,सांगली, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असून, त्यांच्या गावाकडे येण्या जाण्यासाठी अनेक समस्यांना आज सामोरे जाण्याची वेळ आज त्याच्यावर आली आहे. त्याना रस्ते मार्गावर अवलंबून रहावे लागत आहे .
पिंपरी चे मनोहर जेठवाणी यांनी देखील सह्याद्री एक्सप्रेसला पिंपरी येथे थांबा असून कोरोना पासून कोरोना काळापासून ही एक्सप्रेस गाडी बंद झाल्यामुळे अनेक सिंधी व्यापाराचे तसेच बांधवांचे नातेवाईक कल्याण मध्ये असल्यामुळे त्यांना ये- जा करणे आज त्रासाचे होत आहे.

तसेच पिंपरी हे व्यापाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्यामुळे येथे कोरोना काळापासून बंद केलेली मुंबई ते कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस त्वरीत सुरू करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाला केले.
चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख शोभा वर्मा म्हणाल्या पुणे जोधपुर एक्सप्रेस गाडीला पाच थ्री टायर्स स्लीपर कोच, चार जनरल बोगी ,चार एसी थ्री टायर, एक टू टायर स्लीपर कोच, एक गार्ड वॅगन व एक पावर कार अशा बोगी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button