- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शालेय व महाविद्यालयीन जीवनात 45 वर्षांपूर्वी तीन चौक तेरा, लग्ना आधी वरात, अपराध मीच केला, सूर्याची पिल्ले अशा जवळपास 12 नाटकात अभिनय केला आणि त्यानंतर प्रत्यक्ष जीवनाचे नाट्य सुरू झाल्यामुळे नाटक करण्याला संधीच मिळाली नाही. पण एक दिवस पैस रंगमंच अर्थात थिएटर वर्कशॉप कंपनी चे संचालक प्रभाकर पवार यांची सहज भेट झाली. या भेटीत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचा एक वर्षाचा नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवितात असे समजले. वय वर्ष अवघे 71 असूनही प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे भूतपूर्व कुलसचिव डॉ.…
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ‘पीएमपीएमएल’चे मोफत पास द्या – भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इयत्ता ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत बस पास सुविधा सुरू करणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्याकामी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना दररोज शाळा, महाविद्यालये किंवा शिकवणी वर्गांमध्ये पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. सध्या पीएमपीएमएल ही सेवा या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक २०२५ करीता शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजना बाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी श्री बी एल संदीप कुमार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक डांगे चौक, थेरगाव येथे घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी श्री बी एल संदीप कुमार यांना पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महानगरपालिकांच्या निवडणूक अनुषंगाने राज्यभरामध्ये प्रदेश काँग्रेस पक्षाकडून प्रभारी यांची नियुक्ती करून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्याचा आढावा घेण्यात येत आहे. विशेषतः ब्लॉक कमिटीच्या कार्याचा आढावा, सर्व सेल व विभाग…
महिलांनी संघवी प्रतिनिधींना मांडल्या व्यथा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर, दवाबाजार परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांच्या स्थानिक विकास निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला असून तो चिंचवड स्टेशनजवळील मॉडर्न सायकल शेजारील संघवी इंडस्ट्रियल कंपाऊंड या ठिकाणी उभारण्यात येणार होता. मात्र, अजय संघवी यांनी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विरोध दर्शविला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी पूर्वीही MSEB चा ट्रान्सफॉर्मर होता आणि सदर जागा महापारेषण कंपनीच्या अखत्यारीतील उच्चदाब वाहिनीखाली येते. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली संघवी यांच्या गेटसमोर मोर्चा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करणाऱ्या तुर्की, अझरबैजान आणि चीन या देशांच्या उत्पादनांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात एक लेखी पत्र दिले आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये आणि इतर सरकारी कामांमध्ये या देशांच्या उत्पादनांचा वापर तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी काटे यांनी पत्राद्वारे केली आहे. शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. पाकिस्तानला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत जवळपास सव्वा तीन लाख नागरिकांनी य सवलतींचा लाभ घेतला आहे. आता या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असून नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास १० टक्के सवलत व कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेवर ३० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यासोबतच,…
हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन सह्यांच्या मोहिमेला आता राजकीय पाठबळ मिळाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी या मोहिमेला ठाम शब्दांत पाठिंबा जाहीर केला असून, “या प्रश्नावर मी हिंजवडीतील नागरिकांच्या सोबत आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात सध्या नागरिक व आयटीयन्स रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाय व्हावा, यासाठी वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संस्थेचे (WPRDWA) अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या पुढाकाराने #UNCLOGHinjawadiITPark या मोहिमेंतर्गत ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नेवाळे वस्ती येथील Birds International School कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेले स्ट्रोम वॉटर लाईनचे काम एप्रिल २०२५ पासून रखडले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याची संपूर्ण खोदाई झालेली असून, पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. लहान मुलांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.या ठिकाणी तातडीने पुढील उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे: कामाचे वेळापत्रक जाहीर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समिधा गझल मंच, पुणे या संस्थेच्या उद्घाटनानिमित्त शनिवार, दिनांक २८ जून) सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे सायंकाळी ठीक पाच वाजता गझलसागर प्रतिष्ठान प्रस्तुत गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या ‘गझलसंवाद’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गझलकार प्रा. सतीश देवपूरकर आणि म. भा. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या मैफलीचे सूत्रसंचालन डाॅ. अविनाश सांगोलेकर करणार आहेत. नि:शुल्क असलेल्या मैफलीत गझललेखन आणि गझलगायनाचे तंत्र – मंत्र तसेच विविध रंजक किस्से आणि गप्पांचा आनंद श्रोत्यांना घेता येईल. अधिक माहितीसाठी समिधा गझल मंचाचे संस्थापक – अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटोळे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९८१४२७९ वर संपर्क साधावा.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, एकमेकांना माऊली… माऊली या नावाने मारलेली हाक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलींचा उत्फुर्त प्रतिसाद अशा वातावरणात सलग चौथ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे तर्फे सायकल वारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. एमआयटी एडीटी विद्यापीठाने सायकल वारीच्या माध्यमातून भक्तिभाव, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक संदेशाचा संगम साधताना लोणी-काळभोर येथून ३५ सायकलस्वारांच्या चमूसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना अवघ्या एका दिवसात २२० किमीचे हे अंतर पार केले. सायकल स्वारांच्या या चमूने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाने प्रवास करत विद्यापीठात राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी मोठ्या…
