- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध प्रभागांमध्ये आज विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली गेली. धार्मिक स्थळे, सार्वजनिक जागा, रस्ते आणि बागा याठिकाणी स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे पार पडले. या उपक्रमाला नागरिक, स्वयंसेवी संस्था व खासगी कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने सीएसआर प्रकल्पांतर्गत खासगी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर आणि स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था यांच्यासमवेत संयुक्तपणे साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड महापालिका, महिंद्रा लॉजिस्टिक्स व क्रिएटिव्ह कुटीर…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ यांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके होते. बैठकीत आदिवासी समाजासाठी विविध योजनांची अंमलबजावणी, प्रशासनातील समन्वय, तसेच विविध प्रकल्पांची अडचणी यावर सखोल चर्चा झाली. योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी कार्यपद्धती तयार करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. या बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठार, शंकर मांडेकर, उमा खापरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी…
जागतिक शांतीदूत परिवार संस्थेतर्फे २०२५ चा पुरस्कार आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, संशोधक ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर यांना जागतिक ‘शांतीदूत परिवार’ संस्थेच्या वतीने २०२५ चा मानाचा “शांतीदूत सेवारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अप्पर पोलिस आयुक्त निखिल पिंगळे, जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह.भ.प. प्रशांत महाराज यांना “शांतीदूत सेवारत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. प्रशांत महाराज मोरे यांनी परदेशात आंतरराष्ट्रीय पातळी वरही संत विचार प्रसाराच्या कार्यासाठी सेवा रुजू केली. या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यटन क्षेत्राला चालना देणारा आणि शहराच्या वैभवात भर घालणारा मौजे डुडुळगाव येथील प्रस्तावित ‘‘इको टुरिझम पार्क’’ च्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या वन विभागाकडून तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आवाश्वासन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. वन विभागाशी संबंधित विविध मागण्यांसाठी वन मंत्री नाईक यांनी सविस्तर बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, पुण्यात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, शोमिता विश्वास, नरेश झुरमुरे, विवेक खाडेकर, महादेव मोहिते असे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविधतेने नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे. ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. तोच समाजाचा स्थायी भाव आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. माणूस आपलेपणाकडे झुकला तर देवरुप होतो. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांती सेवा, परोपकाराचे कार्य करणारे आदर्श समाजात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या उत्तुंग जीवनकार्याच्या आढावा घेणा-या ‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार, वैद्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील जागा ही अनेक वर्षांपासून माता रमाई यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात आली होती. ही जागा समाजाच्या ऐतिहासिक स्मृती आणि श्रद्धेचा भाग आहे. मात्र, अलीकडे महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे या जागेवरील ‘माता रमाई स्मारकासाठीचे आरक्षण रद्द करून, तेथे पोलिस स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हा निर्णय समाजाच्या भावना आणि इतिहासाचा घोर अपमान असून, या विरोधात आम आदमी पार्टीने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.शहराध्यक्ष रविराज काळे यांनी म्हटलं आहे की,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह माता रमाई यांचे स्मरण हे केवळ एक स्मारक नाही,तर एका क्रांतीचा, त्यागाचा आणि सामाजिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. हा आराखडा १९४७ सालापासून पिंपरी कॅम्पमध्ये स्थायीक झालेल्या सिंधी व इतर व्यापारी बांधवांवर अन्यायकारक आहे. यामुळे येथील व्यापाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात येऊन त्यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यामुळे या प्रारूप विकास आराखड्यावर पिंपरी येथील व्यापारी संघटना यांच्यावतीने हरकत घेण्यात आली असल्याबाबतचे लेखी पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. तसेच पिंपरी कॅम्प या परिसराला “गावठाण” घोषित करून गावठाणाच्या सेवा, सुविधा द्याव्यात अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. यावेळी व्यापारी सुरेश शर्मा, जगदीश आसवाणी, आकाश बजाज, सावल तोताणी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. महायुतीतीलच सहकारी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर ‘तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवला? असं वक्तव्य करीत प्रसारमाध्यमात त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपचे पक्षप्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार हल्ला चढवला आहे. पत्रकात राजू दुर्गे यांनी म्हटले आहे की, हे प्रदेश प्रवक्ते आज ज्या पक्षाची पाठराखण करताना दिसतात, त्यांनाच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्ष प्रमुखांनी काय उपमा दिली होती याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. त्यानंतर याच पक्ष प्रवक्त्यांनी निवडणुकीत शरद पवार…
चाकण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड यांच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा व रिक्षा चालकांचे ज्येष्ठ नेते कैलास नाना वलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती*चे महाराष्ट्र अध्यक्ष व नांदेड पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे, आरटीओ अधिकारी विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय चव्हाण, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी शनिवार (२८ जून) व रविवारी (२९ जून) या दोन्ही दिवशी मालमत्ता कर भरण्यासाठी कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सुरू राहतील, अशी माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी ३० जून २०२५ पर्येंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिलं वेळेत वाटप करण्यात आली आहेत. तसेच, सवलतीबाबत माहिती पोहचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून वारंवार…
