ताज्या घडामोडीपिंपरी

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांचा  सत्कार सोहळा व कैलास नाना वलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार

Spread the love

 

चाकण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड यांच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा व रिक्षा चालकांचे ज्येष्ठ नेते कैलास नाना वलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. बाबा कांबळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती*चे महाराष्ट्र अध्यक्ष व नांदेड पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे, आरटीओ अधिकारी विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय चव्हाण, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रमुख अनिल शिरसाठ, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रदीप अय्यर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जाफरभाई शेख, नंदू शेठ शेळके , पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे, पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख, उपाध्यक्ष प्रवीण शिखरे, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे ,सचिव अविनाश वाडेकर , विशाल ससाने,सिद्धेश्वर साबळे, सागर जाधव, सलीम पठाण ,किशोर कांबळे, पप्पू गवारे ,दत्ता गिल्ले, बालाजी गायकवाड, उमाकांत शिंदे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबा कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 2006 मध्ये स्थापन झालेल्या *महाराष्ट्र रिक्षा पंचायत*ने गेल्या 20 वर्षांत अनेक प्रश्न मार्गी लावले. 1997 मध्ये बंद झालेले रिक्षा परमिट पुन्हा सुरू करण्यात यश मिळाले. मात्र, सध्या प्रमाणापेक्षा जास्त परमिटमुळे पुन्हा परमिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांवरही काम सुरू आहे. तसेच, रिक्षा चालकांसाठी *कल्याणकारी महामंडळ* स्थापन करण्यात आले असून, रिक्षा चालकांना म्हातारपणात पेन्शन मिळावी, तसेच प्रामाणिक चालकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी संघटनेची भूमिका आहे. “ही संघटना एकट्याची नाही, तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांच्या बळावर ती वटवृक्ष बनली आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.

नरेंद्र गायकवाड यांनी नांदेड येथील परंपरेनुसार खारीक-खोबऱ्याचा हार आणून डॉ. बाबा कांबळे व त्यांच्या पत्नीचा सत्कार केला. ते म्हणाले, “मी बाबांसोबत महाराष्ट्रभर फिरलो आणि रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली.” आनंद तांबे यांनी टू-व्हीलर टॅक्सीला विरोध व्यक्त करताना सांगितले की, यापूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात यशस्वी लढा दिला असून, पुढील काळातही हा लढा यशस्वी होईल. विजय महाजन यांनी रिक्षा चालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले.

कैलास नाना वलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकाराम महाराजांच्या पगडीसह वारकरी संप्रदायातील वस्त्र देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव, कैलास नाना वलांडे, राजू शिंदे, सुरज ठोंबरे, प्रकाश खंडेबराड, सचिन वलांडे, संदीप वलांडे*, *सागर गायकवाड , बाळू बागडे, सतीश मुंगसे, सागर मुंगसे ,दत्ता कुटे ,शरद वाघुले ,भगवान खांडेभराड, रामदास लोणारी, नितीन कुटे,आतिश भुजबळ, गजानन लोणारी, हसन तांबोळी, गोरख शिंदे, शांताराम मुंगसे, नितीन वाडेकर, राहुल बागडे, रुपेश शिंदे ,सचिन वाघमारे, अशोक दौंडकर ,प्रशांत मरळ, दिनेश पिंगळे ,निलेश वाघुले, श्रीकृष्ण मुंगसे, गणेश शिंदे, रोहिदास मुंगसे , पोपट खांडेभराड ,गोरख वलांडे, सुरज कड, मिननाथ कानडे, आनंदा कामठे, सुरज मुंगसे, मगर पुरी, मारुती शितोळे, लक्ष्मण गांडेकर, अतुल चौधरी, नवनाथ साळुंखे, महेश कदम, शिवाजी डावरे, माऊली शिंदे, सचिन कांबळे, दत्ता लोणारी ,शिवाजी भिंगारदिवे ,अक्षय वलांडे, आकाश शिंदे ,अनिकेत कड, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button