ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील ‘‘इको टुरिझम पार्क’’ च्या कामाला गती!  राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

भाजप आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यटन क्षेत्राला चालना देणारा आणि शहराच्या वैभवात भर घालणारा मौजे डुडुळगाव येथील प्रस्तावित ‘‘इको टुरिझम पार्क’’ च्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या वन विभागाकडून तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आवाश्वासन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

वन विभागाशी संबंधित विविध मागण्यांसाठी वन मंत्री नाईक यांनी सविस्तर बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, पुण्यात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, शोमिता विश्वास, नरेश झुरमुरे, विवेक खाडेकर, महादेव मोहिते असे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे डुडुळगाव येथे राज्य सरकारच्या वन विभागाच्या माध्यमातून ‘‘इको टुरिझम पार्क’’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच, आण्णाभाऊ साठेनगर वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी परवानगी मिळावी. मंजूर विकास योजनेतील रस्त्यासाठी भूखंड हस्तांतरण आणि मौजे मोशी, गट क्र. ६४६ मधील प्रस्तावित २२०/३३ के.व्ही. उपकेंद्रासाठी अभिप्राय मिळावा, अशी मागणी केली.

डुडुळगाव येथील वन विभागाच्या मालकीच्या भूखंडावर “इको टुरिझम पार्क” उभारण्याचा प्रस्ताव आहे. सदर प्रकल्पासाठी अंदाजे 2.62 कोटी रुपये निधीची आवश्यकता असून, तो वन विभाग तसेच जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मागविण्यात आलेला आहे. संबंधित प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. या प्रकल्पाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे.

‘इको टुरिझम पार्क’साठी तात्काळ निधी उपलब्ध करण्यात येईल. महानगरपालिकेच्या प्रस्तावांतर आगामी 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, तसेच आण्णाभाऊ साठेनगर वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी वन विभागाचा अडथळा येणार नाही, असे आश्वासन वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे. त्यामुळे वन विभागाशी संबंधित कामांना गती मिळेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button