ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी कॅम्प मधील रस्ते रुंदीकरणास पिंपरी मर्चंट फेडरेशन चा तीव्र विरोध – श्रीचंद आसवानी 

प्रारूप विकास आराखडा बाबत पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांची हरकत 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. हा आराखडा १९४७ सालापासून पिंपरी कॅम्पमध्ये स्थायीक झालेल्या सिंधी व इतर व्यापारी बांधवांवर अन्यायकारक आहे. यामुळे येथील व्यापाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात येऊन त्यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यामुळे या प्रारूप विकास आराखड्यावर पिंपरी येथील व्यापारी संघटना यांच्यावतीने हरकत घेण्यात आली असल्याबाबतचे लेखी पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे.
   तसेच पिंपरी कॅम्प या परिसराला “गावठाण” घोषित करून गावठाणाच्या सेवा, सुविधा द्याव्यात अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
   यावेळी व्यापारी सुरेश शर्मा, जगदीश आसवाणी, आकाश बजाज, सावल तोताणी, नीरज चावला, रमेश जधवाणी, दीपक सोनाजी, अर्जुन मेलवाणी, जयराम नागदेव, सुनील हिंगोराणी, रवी गोरवाणी, अवि तेजवाणी आदी उपस्थित होते.
     यामध्ये साई चौक, पिंपरी (शनी मंदिर – वैष्णव देवी मंदिर) ते लालबहादूर शास्त्री उद्यान; साई चौक पिंपरी ते भटनागर चौक; रेल्वे स्थानक (साई बाबा मंदिर क्रांती रिक्षा स्टॅन्ड) ते स्वर्गीय किंमतराम आसवाणी अंडरपास पर्यंत; लाल बहादूर शास्त्री उद्यान ते साधू वासवाणी रस्ता; लालबहादूर शास्त्री उद्यान ते अशोक थिएटर; अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्त्यापर्यंत; काळेवाडी पूल (पवना नदी जवळून) ते पवनेश्वर मंदिर पूल; रिव्हर रस्ता (स्टेट बँक ऑफ इंडिया) ते मिलिंद नगर; डीलक्स थिएटर रस्ता ते नऊ मीटर रस्त्यापर्यंत; रवी सोसायटी ते अशोक थिएटर या पिंपरी कॅम्प मधील अंतर्गत रस्ते सद्यपरिस्थितीत आहे असेच ठेवावेत बदल करू नये अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
    हे रस्ते आणखी रुंद केल्यास येथील व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा व निवासाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या परिसरात प्रारूप विकास आराखडा राबवू नये. तसेच मागील अनेक वर्षांपासूनची पिंपरी कॅम्प परिसराला गावठाणाचा दर्जा देण्याची मागणी पूर्ण करून येथील रहिवासी व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button