- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकत्याच आयोजित पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संत परंपरेचे दर्शन घडवत श्री विठ्ठल रुक्मिणी पालखीचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालखी सोहळ्यास नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे , कार्यकारी संचालक विलास जेऊरकर शाळेच्या व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे,तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर यांची प्रमुख उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रचलित कायद्यांचीच अंमलबजावणी करावी. तसेच सुधारित कामगार कायदे मागे घ्यावेत अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात संघटीत, असंघटीत सर्व क्षेत्रातील कामगारांचे देशभरात सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष तथा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला. बुधवार (दि. ०९ जुलै २०२५) कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व संघटीत, असंघटीत कामगार संघटनाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो कामागारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत फलक फडकवले. या आंदोलनात माजी नगरसेवक मारुती भापकर, आयटक अरविंद जक्का, अनिल…
आमदार जगताप यांनी केले निर्णयाचे स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारी आणि शेतमालकांच्या मालमत्तेवरील बंदी हटवणारी ऐतिहासिक पावले असल्याचे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. “या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जमिनीचे विभाजन, खरेदी-विक्री, वारसा हक्काचे प्रश्न अडकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि अल्पभूधारकांचे मोठे नुकसान होत होते. कायदा रद्द झाल्यास या अडचणी दूर होऊन व्यवहार खुले होतील आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता मिळेल,” असे आमदार जगताप म्हणाले. तुकडेबंदीमुळे अनेक कुटुंबांमध्ये जमिनीच्या तुकड्यांवर व्यवहार न करता आल्याने वाद, न्यायालयीन खटले, उत्पन्नात अडथळा आणि विकास योजना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात रोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत लक्ष वेधले होते. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जुलै रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईच्या विधान भवनात गुरुवारी (१० जुलै) दुपारी १.४५ वाजता होणार असून त्यामध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि प्रशासनातील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. शंकर जगताप यांचा पाठपुरावा आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, “हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो कर्मचारी त्रस्त झाले आहेत. वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाढत आहे. रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा संबंधित अधिकाऱ्यांना ‘कालबद्ध’ कार्यक्रम आखून देण्यात येईल. भूसंपादनाचा प्रमुख अडथळा असल्यामुळे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. पुणे रिंगरोड, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर यासारख्या प्रमुख प्रकल्पांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दिले. विधानसभा पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे रिंगरोडचे काम रखडले असून, त्याला गती मिळावी. यासह शहराच्या सभोवताली व अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत,महानगरपालिकामधील सफाई आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्या सफाई किंवा ड वर्गातील कर्मचाऱ्यांने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १, लिपिक ७, शिपाई ९ , मजूर ४ , गटरकुली १…
समाज विकास विभागामार्फात आठही क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्हने तयार केलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजमुळे महिलांना स्वतःच्या हातांनी बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा प्रकल्पा’ अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजचे उद्घाटन प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर या ठिकाणी प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोड याठिकाणी सुरू असलेल्या आज १२ मी. व १८ मी.रस्त्याच्या काँक्रेटिकरण कामाची पाहणी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली. गेली अनेक दिवसांपासून कुणाल आयकॉन रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्याचे काम प्रकल्प विभागामार्फत सुरु आहे. कामात येणाऱ्या विविध अडचणी मूळे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा वेग मंदावला असल्याणे कुणाल आयकॉन रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्येमूळे नागरिक हैराण झाले आहेत. या विषयी गांभीर्याने दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी आज सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकार काही वर्षापासून कामगार विरोधी धोरणे आणि कायदे आखत असून त्याचा परिणाम देशभरातील कोट्यावधी कामगारावरती होत आहे. महागाईचे धोरण,बेरोजगारी वाढवणारी नीती आहे त्याचबरोबर कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ४ श्रमसंहिता आणल्या आहेत त्यामुळे कामगारांचे नुकसान होत याला विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील केंद्रीय संघटनानी आज बंद पुकारला याला कष्टकरी संघर्ष महासंघाने पाठिंबा देत सहभागी झाले . कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार ,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार अशा विविध घटकातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पिंपरी चिंचवड शहरातील थरमॅक्स चौक, डांगे चौक, रहाटणी , निगडी , एमआयडीसी या ठिकाणी घोषणा देत संपात कामगार सहभागी झाले.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव, चिंचवड येथील ग्रीन्स सोसायटीत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात (रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी) साजरा झाला. पारंपरिक टाळ, मृदंग आणि अभंगगायनाच्या गजरात, संपूर्ण सोसायटीत दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या तयारीची सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरू झाल्या दिवशीपासूनच झाली. त्यानंतर रोज सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी हरिनामाचा गजर केला, आणि संपूर्ण परिसर पांडुरंगमय झाला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी प्रथम विठ्ठल-रुक्मिणी पूजन आणि त्यानंतर पालखी पूजन, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर झामाबाई बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल बारणे यांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. दिंडीत लहानग्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात सादर केलेल्या गोड…
