ताज्या घडामोडीपिंपरी

कामगारांवरती अन्यायकारक ४ श्रम संहिता रद्द करा – काशिनाथ नखाते

देशव्यापी संपात शहरातील कामगार सहभागी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकार काही वर्षापासून कामगार विरोधी धोरणे आणि कायदे आखत असून त्याचा परिणाम देशभरातील कोट्यावधी कामगारावरती होत आहे. महागाईचे धोरण,बेरोजगारी वाढवणारी नीती आहे त्याचबरोबर कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ४ श्रमसंहिता आणल्या आहेत त्यामुळे कामगारांचे नुकसान होत याला विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील केंद्रीय संघटनानी आज बंद पुकारला याला कष्टकरी संघर्ष महासंघाने पाठिंबा देत सहभागी झाले .

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार ,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार अशा विविध घटकातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पिंपरी चिंचवड शहरातील थरमॅक्स चौक, डांगे चौक, रहाटणी , निगडी , एमआयडीसी या ठिकाणी घोषणा देत संपात कामगार सहभागी झाले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड,मनपा सदस्य सलीम डांगे,नंदू आहेर,सुनील भोसले, कालिदास गायकवाड, सुनील भोसले, राजेंद्र कुटकर, प्रशांत मोरे, रमेश बंडगर ,संदीप कांबळे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे आदीसह कामगार उपस्थित होते.

नखाते म्हणाले की देशभरातील संघटना यांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे यात बँकिंग क्षेत्र, विमा क्षेत्र, टपालक्षेत्र, कोळसा, खाणकामगार, वाहतूक, महामार्ग अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी कामगारांच्या हक्कासाठी हा बंद पुकारलेला आहे.
केंद्र सरकारकडून मालक वर्गावर मेहेर नजर आणि कामगार देशोधडीला लावण्यासाठी ४ कामगार श्रम संहिता लादण्याचे प्रयत्न होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विषमता वाढत जाते आहे, कामगार चळवळ दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार व राज्य सरकार करत असून कामगारांचे हक्क हिरावून घेणे, कामाचे तास वाढवणे ,तुटपुंज पगार देणे आधी बाबीचा विरोध कामगार बांधव आता करत असून त्यांना काम मिळत नाही आणि मिळाले तरी पगार नीट मिळत नाही अशी स्थिती आहे महागाईनुसार वेतन वाढ होणे गरजेचे असताना केवळ ठराविक लोकांना भरमसाठ पगार देण्यात येतो आणि खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगार वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. हे थांबले नाही तर विधानभवनावर हे आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातली संघटना आहे पुढील कालावधीमध्ये एकत्र येऊन लढा देतील महासंघातर्फे विविध ठिकाणच्या कामगारांना एकत्रित करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या यावेळी घोषणा देत कामगारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button