Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पुणे-पिंपरी-चिंचवड वाहतूक कोंडीमुक्तीसाठी आता ‘ॲक्शन प्लॅन’
ताज्या घडामोडी

पुणे-पिंपरी-चिंचवड वाहतूक कोंडीमुक्तीसाठी आता ‘ॲक्शन प्लॅन’

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 July 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा संबंधित अधिकाऱ्यांना ‘कालबद्ध’ कार्यक्रम आखून देण्यात येईल. भूसंपादनाचा प्रमुख अडथळा असल्यामुळे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. पुणे रिंगरोड, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर यासारख्या प्रमुख प्रकल्पांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दिले.

विधानसभा पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे रिंगरोडचे काम रखडले असून, त्याला गती मिळावी. यासह शहराच्या सभोवताली व अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल आणि आमदार महेश लांडगे यांनी लक्षवेधीद्वारे केली.

आमदार राहुल कुल म्हणाले की, पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मन:स्ताप होतो आहे. शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि शहराला जोडणारे रस्ते आणि त्यावरील वाहतूक समस्या असे दोन वेगळे विषय आहेत. महायुती सरकारने हडपसर ते यवत आणि पुणे ते शिरुर आणि पुणे रिंगरोडच्या कामाला मंजुरी दिली. सदर मार्ग ४ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. असे असले तरी निश्चित कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण होण्यासाठी समन्वय यंत्रणा तयार करावी. प्रत्येक महिन्याला बैठक घेवून प्रकल्पाची प्रगतीबाबत लोकप्रतिनिधींना अवगत करावे. रस्त्यांची दुरावस्था, अतिक्रमण आणि स्मार्ट सिटीमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आणि फूटपाथ स्मार्ट झाले. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, हिंजवडी आयटी हब, ऑटो हब, पुणे विमानतळ अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या मध्यावर असलेले पुणे-पिंपरी-चिंचवड शहर मोठ्याप्रमाणात विस्तारीत होत आहे. वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांमध्ये नाराजी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील वर्षभरात १ लाखाहून अधिक वाहने रस्त्यावर येणार आहेत. तळेगाव- शिक्रापूर, वाघोली-शिरुर, हडपसर- दौंड या रस्त्याचे काम सुरू होते आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार आहेत. पण, पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. तसेच, पुणे-बेंगलोर महामार्ग आणि हिंजवडी आयटी हब कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांच्या प्रस्तावित कामांना गती देण्याची आवश्यकता आहे.

अधिकारी- लोकप्रतिनिधी बैठक घ्या…
पुणे-नाशिक महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपलिका, पीएमआरडीए सोबत राज्य सरकारने निधी उभारावा. हिंजवडी आयटी हबची जगभरात ओळख आहे. पण, काही दिवसांपूर्वी पावसामुळे रस्ते कॅनाॅल झाले. रस्त्यांची कामे निश्चित वेळेत पूर्ण होत नाहीत. कारण, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. चांगला परतावा दिल्यास शेतकरी जागा देतील. भूसंपादनासाठी अडचणी येत आहेत, तर जिल्हाधिकारी प्रशासनाने ‘इंटीग्रेटेड ऑथॉरिटी’ तयार करावी. २०३० पर्यंत ‘‘महाराष्ट्र फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी’’ असा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे योगदान राहणार आहे. पण, त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांमधील प्रमुख सेवा रस्ते आहेत. त्यामुळे रस्ते ट्रॅफिकमुक्त झाले पाहिजेत. यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.

पुणे रिंगरोड, पुणे-बेंगलोर महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग याच्या प्रस्तावित कामांसाठी संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी नियोजित केली जाईल. स्थानिक पातळीवर असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून भूसंपादन करीत आहोत. 9 पॅकेजमध्ये पुणे रिंगरोड होणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. आगामी 3 वर्षांत रिंगरोड पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– दादा भुसे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी
Next Article हिंजवडी वाहतूक कोंडीवर तातडीची बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.