Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या वतीने Roots-VIII ही सौंदर्य व प्रक्रियात्मक त्वचाविज्ञान, लेझर तंत्रज्ञान आणि त्रायकोलॉजी यांना समर्पित एक प्रतिष्ठित परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतातील तसेच परदेशातील ख्यातनाम त्वचारोगतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आले होते, जेथे त्यांनी या क्षेत्रातील नव्या प्रगत उपचारपद्धती आणि क्लिनिकल उत्कृष्टतेचे अनुभव सादर करण्यात आले. या परिषदेत वैज्ञानिक व्याख्याने, संवादात्मक चर्चासत्रे आणि थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते, जे सहभागींसाठी समकालीन त्वचावैज्ञानिक तंत्रांच्या व्यापक अध्ययनाचा अनुभव ठरले. इंजेक्टेबल्स आणि लेझर तंत्रज्ञानाच्या मूलभूत ज्ञानापासून…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा आणि जेष्ठांचा सन्मान करणारा अत्यंत महत्वाचा दिवस समजला जातो. याच अनुषंगाने चिंचवड येथील काकडे टाऊनशिप ओम गणेश सोसायटीत गुरुपौर्णिमेचा सण अतिशय उत्साहात, भावनिक आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री दत्त व स्वामींच्या मूर्तीचे पूजन करून, सोसायटीतील जवळपास 25 ते 30 जेष्ठ नागरिकांचे औक्षण, पूजन व सन्मान करण्यात आला. जेष्ठांना श्रीफळ, गुलाबफुल, माऊलींचा फोटो देत सन्मानित केले गेले. फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक जेष्ठांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यक्रमात रंग भरले. या उपक्रमाची संकल्पना सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी मांडली…

Read More

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी कुदळवाडी मनपा शाळेत “आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. “गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ” या विचारातून प्रेरणा घेत गुणवंत, सेवाभावी व प्रेरणादायी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन आ. महेशदादा लांडगे युवा मंच, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान आणि श्री. दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन  दिनेश लालचंद यादव व निशा दिनेश यादव यांनी केले. ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा , खजिनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका तेजल शहा , प्रभारी प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरीया , क्वीक हीलच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आदीच्या उपस्थितीत महाविद्यालयात बैठकीत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात प्रतिभा कॉलेज चिंचवड च्या वतीने क्वीक हिल फाउंडेशन बरोबर सांमजस्य करार केला असून या मोहिमे अंतर्गत अनेक जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या क्वीक हिल फाउंडेशनच्या उपक्रमासाठी प्रतिभा महाविद्यालयाच्या काही उत्साही व क्रियाशील विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संत रोहिदास प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्ली येथे मिळालेल्या पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवीच्या सन्मानार्थ चिखली येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जाचे ज्ञानेश्वर कांबळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी  संत रोहिदास विचार समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे, दत्तात्रय शिंदे, संत रोहिदास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रामेश्वर पाचारे, बाबा पोळ, पांडुरंग सोनटक्के, संतोष वाघमारे, सुनील सोनवणे, रखमाजी गोरे, रोहिदास सोनवणे, बाळू पोळ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले की, “डॉक्टर बाबा कांबळे यांचे यश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध,पुणे येथील टपाल कर्मचाऱ्यांसाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या संस्थेने रेनकोटचे वाटप केले . हा प्रकल्प क्लबच्या माजी अध्यक्ष आरती मुळे यांनी संपूर्णपणे प्रायोजित केला होता. एकूण 18 कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आले .विद्यमान अध्यक्ष कमलजीत कौर ,सचिव दिपाली जाधव आणि आणि इनरवेलच्या माजी जिल्हाध्यक्ष मुक्ती पानसे ,या वेळी उपस्थित होत्या.इनरव्हील ही फक्त महिलांनी चालवलेली पिंपरी चिंचवड मधील अग्रगण्य सामाजिक संस्था आहे.संस्थेच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन आयोजित मोफत वैद्यकीय सेवा व मोफत औषध गोळ्या वाटप  केले.वारी म्हणजे , सेवा , श्रद्धा आणि समर्पणत्याच अनुषंगाने देहू ते पंढरपूर पायी चालणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा देणायत आली. अनेक भाविक वारकरी वेगवेगळ्या गावातून शहरात येतात काही वेळेस वातावरण बद्दलामुळे किंवा पावसामुळे आजारी पडतात , ह्या मुके कोणत्याही भाविकांची वारी चुकू नये ह्या साठी मागील १५ वर्षांपासून कै तुकाराम तनपुरे फौंडेशन कार्य करीत आहे , दर वर्षी सुमारे १००० व अधिक वारकरी ह्या सेवेचा लाभ घेतात , ह्या मध्ये वेदांत हॉस्पिटल व धनश्री हॉस्पिटल चे डॉक्टर , सिस्टर…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड गावठाण हद्दीतील सर्वे नंबर २ मध्ये असलेल्या नैसर्गिक ओढ्याला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते  विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाकडे  निवेदनाद्वारे मागणी  केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ओढ्याच्या काठावरून नागरिकांची व लहान मुलांची रोज ये-जा होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच ओढ्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, डासांची उत्पत्ती, साचलेले पाणी यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे रोग फैलावण्याची शक्यता निर्माण झाली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)न्यायालयातील दाखल प्रकरणात संवादातून वाद मिटावा त्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू आहे. या काळात प्रलंबित केसेसचा संवादातून तोडगा काढला जाईल. पक्षकारांनी प्रकरणे संवादाने मिटवावे यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री महेंद्र महाजन व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी आवाहन केले होते. त्यासाठी मध्यस्थ म्हणून पिंपरी न्यायालयात ॲड.अतिश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. विवेक ( नावे बदललेली)आणि नीलिमा ( नावे बदललेली) यांचा विवाह 24/ 2 /2003 रोजी हिंदू रीतीने देवाच्या प्रमाणे झाला. नीलिमाच्या आई-वडिलांनी श्रीधर म्हणून लग्नामध्ये सात तोळे पाहुण्यांचा मानपान फ्रिज, टीव्ही, पलंग अशा सर्व वस्तू विवेकला दिल्या. विवेक हा एका राष्ट्रकृत बँकेवर…

Read More

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासाला चालना देणार — मुख्यमंत्री आमदार सुनील शेळके यांच्या ठोस पाठपुराव्याला यश मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) विधानभवन, मुंबई येथे कॅन्टोन्मेंट बोर्ड संदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. या विषयावर आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने लक्ष वेधल्याने व त्यांच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्राच्या अखत्यारीतील क्षेत्र, पण राज्याकडूनही विशेष लक्ष देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र असल्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीचा सातत्याने अभाव जाणवतो. शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी…

Read More