कुदळवाडीत “आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी कुदळवाडी मनपा शाळेत “आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
“गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ” या विचारातून प्रेरणा घेत गुणवंत, सेवाभावी व प्रेरणादायी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन आ. महेशदादा लांडगे युवा मंच, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान आणि श्री. दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन दिनेश लालचंद यादव व निशा दिनेश यादव यांनी केले.
ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी, शिक्षकांच्या अनुभवांचे कथन व पुरस्कार वितरणाचे सोहळ्याचे क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले. “शिक्षक समाजाचा खरा शिल्पकार आहे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत असा सन्मान सोहळा दरवर्षी व्हावा,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मुख्यध्यापक संपत पोटघन,मारुती खामकर,दत्तात्रय मोरे, किसन आप्पा यादव,उत्तम बालघरे, नितीन साळी, विशाल डोगंरे, दिपक घन,रामलाल देवासी, स्वराज पिजंण,शरद गोरे,स्वप्निल डावखरे हे मान्यवर उपस्थित होते.













