ताज्या घडामोडीपिंपरी
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइडच्या वतीने टपाल कर्मचाऱ्यांसाठी रेनकोटचे वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध,पुणे येथील टपाल कर्मचाऱ्यांसाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या संस्थेने रेनकोटचे वाटप केले .
हा प्रकल्प क्लबच्या माजी अध्यक्ष आरती मुळे यांनी संपूर्णपणे प्रायोजित केला होता. एकूण 18 कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आले .विद्यमान अध्यक्ष कमलजीत कौर ,सचिव दिपाली जाधव आणि आणि इनरवेलच्या माजी जिल्हाध्यक्ष मुक्ती पानसे ,या वेळी उपस्थित होत्या.इनरव्हील ही फक्त महिलांनी चालवलेली पिंपरी चिंचवड मधील अग्रगण्य सामाजिक संस्था आहे.संस्थेच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.













