- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण औद्योगिक पट्टयातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या समस्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचारी यांसह वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक शासकीय अस्थापनांमध्ये सक्षम समन्वयाची आवश्यकता आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. चाकण औद्योगिक पट्टयात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर राज्य सरकारकडे दाद मागण्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी संघटनांनी ‘‘UNCLOG Chakan MIDC’’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेला आमदार लांडगे यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, संघटनांचे प्रतिनिधी आणि आमदार लांडगे यांची…
भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करा आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश पिपंरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पीएमआरसह हिंजवडी आणि शहर परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार रस्ते रुंदीकरण करणे अपेक्षित आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते रुंदीकरणासह दुरुस्ती करत नागरिकांच्या प्राथमिक गरजा अशा पूर्ण होतील, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसंबंधी केलेल्या उपाययोजनांची पाहणीनंतर शनिवारी (दि.२६) आढावा बैठक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव स्मशानभूमी जवळील महादेव मंदिर परिसरात पारव्यांना खाण्यासाठी धान्य टाकण्यात येत असल्याने पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे थांबवण्याची मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. गच्चीत येणारे हे पारवे गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात. गच्चीत येणारा हा पारवा पक्षी फुप्फुसाच्या संसर्गासारखा गंभीर आजार परविणारा पक्षी आहे. पारव्यांच्या विष्ठेमार्फत या आजाराता फैलाव होतो. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया’ हा आजार होत असून, हा फुप्फुसाशी संबंधित आहे. हा जीवाणू हवेत मिसळून श्वासावाटे आपल्या फुप्फुसामध्ये प्रवेश करतो. यामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत चालला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व २११ बालवाड्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या उपक्रमामुळे सहा हजारांहून अधिक बालकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार, आकर्षक आणि शिकण्यासाठी अनुकूल वर्गखोल्या मिळाल्या असून त्याचा बालकांना खूपच फायदा होतोय. बालवाडीतील बालकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण (ECCE) या रणनीतीवर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बाल केंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला. महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना डीबीटीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विभागाची सक्षम हस्तपुस्तिका, इंग्रजी हस्तपुस्तिका, डिजिटल लर्निंग बालवाडी दिनदर्शिका, प्राथमिक दिनदर्शिका, पालक दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला वस्तू देऊन सन्मान केला. ‘या’ विद्यार्थ्यांचा झाला सन्मान! स्वप्नाली झिंजे…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस अभिमानपूर्वक व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार सदाशिव जाधव यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धातील वीर जवानांचे शौर्य आणि त्याग याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन संदीप काटे होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत शिस्त, संयम आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले आणि शौर्यदिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच आज शाळेला लाभलेले पाहुणे अनिता बडगुजर आणि मीरा राऊत यांनीही विध्यार्थ्यांना संबोधित करत आपले विचार मांडले. या कार्यक्रमास शाळेच्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गुरुवारपासून प्रारंभ झाला. द्वारयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मंगलमूर्तीची विधीवत पूजा करून त्यांना दुर्वा वाहण्यात आल्या. त्यानंतर चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधीचे दर्शन घेऊन द्वारयात्रा पुर्वद्वार श्री मांजराई देवी मंदिराकडे वाजतगाजत मार्गस्थ झाली. त्यावेळी यात्रेत १५० भाविक सहभागी झाले. एम्पायर इस्टेट येथील मांजराई देवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संजय साळवी व अन्य विश्वस्तांनी यांनी द्वारयात्रेचे स्वागत केले. यानंतर श्री मांजराई देवी मंदिरात देवीचे पूजन करून गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे करण्यात आले. यानंतर परत चिंचवड येथे येऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती. डॉक्टरांनी तब्बल ८ तास वाट पाहूनही रक्ताची पूर्तता केली नव्हती. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची चिंता वाढली आणि त्यांनी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लोखंडे यांनी वेळ न दवडता एस.आय. हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) गाठले व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून रुग्णासाठी रक्ताची व्यवस्था करून दिली. त्याच्या या तत्परतेमुळे रुग्णाला आवश्यक असलेले रक्त वेळेवर मिळाले आणि त्याचे प्राण वाचले. या दरम्यान, श्री. लोखंडे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली व अशा प्रकारची दुर्लक्षपणा पुढे चालणार…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कविता हा साहित्याचा आत्मा आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी व्यक्त केले. नांदेड येथे संपन्न होणाऱ्या विसाव्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनपूर्व एकदिवसीय ‘कवितेकडून कवितेकडे…’ या संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, महाराष्ट्र समरसता साहित्य परिषद कोषाध्यक्ष सुनील ढेंगळे, प्रांत संयोजक प्रा. डॉ. धनंजय भिसे, वन्यजीव अभ्यासक डॉ. सुधीर हसमनीस, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष मानसी चिटणीस…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यमुनानगर निगडी या परिसरात प्रसाद कोलते स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनज्योती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशन व दिव्य दृष्टी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि डॉक्टर चाकणे यांच्यामार्फत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी गरजेनुसार रक्तदाब,मधुमेह, ईसीजी अशा तपासण्या सोबतच हृदयाशी संबंधित असलेल्या अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी, हृदय झडपांची शस्त्रक्रिया,कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग रेडिएशन,केमोथेरपी,मुतखडा व मोफत डायलिसिस सुविधा अशा प्रकारचे उपचार व काही तपासण्या या आरोग्य शिबिरात होणार आहेत. नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी व मनोरंजनाचे कार्यक्रम न करता नागरिकांना…
