चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस अभिमानपूर्वक व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार सदाशिव जाधव यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धातील वीर जवानांचे शौर्य आणि त्याग याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन संदीप काटे होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत शिस्त, संयम आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले आणि शौर्यदिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
तसेच आज शाळेला लाभलेले पाहुणे अनिता बडगुजर आणि मीरा राऊत यांनीही विध्यार्थ्यांना संबोधित करत आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास शाळेच्या समन्वयक दीप्ती बक्षी व श्वेता कांत यांचीही विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नाट्यछटा आणि सादरीकरणांच्या माध्यमातून वीर जवानांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकवृंदांचे व आयोजकांचे शाळेचे संचालक श्री संदीप काटे यांनी कौतुक केले.














