Author: maharashtrabreakingnews.com

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनंतर लागूनच शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने, या लॉंग वीकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर लोणावळा आणि खंडाळा परिसरात धाव घेतली आहे. परिणामी, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विशेषतः पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासनतास या कोंडीत अडकून रहावे लागत आहे. लोणावळा शहरातही याचा परिणाम स्पष्टपणे जाणवत असून, शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांजसे की भुशी धरण, लायन्स पॉईंट, खंडाळा राजमाची गार्डन, ड्युक्स नोज पॉइंट, सनसेट पॉइंट आणि खंडाळा तलाव या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात…

Read More

निगडी येथील बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबर दुर्घटनेतील मजूर मृत्यूनंतर गुन्हा दाखल न झाल्याने तीव्र संताप; २४ तासांत गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन – डॉ. बाबा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात, काल दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र आणि शुभ दिवशी, बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत तीन कष्टकरी कामगार—श्री. दत्ता होलारे, श्री. लखन धावरे आणि श्री. साहेबराव गिरसे—यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरातील आधारस्तंभ हरपल्याने कुटुंबियांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या पैकी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणात डक्टमध्ये गुदमरून तिघा कंत्राटी कामगारांचा मृत्यू; अ‍ॅड. सागर चरण यांच्याकडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे चौकशीची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यदिनी घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एचडीएफसी बँकेजवळ बीएसएनएलच्या डक्टमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम सुरू असताना तिघा कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांची नावे लखन धावरे, साहेबराव गिरसाट आणि दत्ता होनाळे असून ते सर्व चिंचवड येथील बिजली नगर परिसरातील रहिवासी होते. अपघातावेळी चेंबरमध्ये साचलेल्या प्राणघातक वायूमुळे या तिघांचा श्वास घेणं कठीण झालं आणि त्यातच त्यांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासींयाची तहान भागविणारे पवना धरण ९५ टक्के भरले आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (शनिवारी) जलपूजन करण्यात आले. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असून शहरवासीयांची वर्षेभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढल्याचे खासदार बारणे म्हणाले. यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, कांता रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, धनंजय नवघने, अमित कुंभार, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, विभाग समन्वयक दर्शना कामत, सुश्री पृथा वैद्य, वंदना सांगळे, अर्चना प्रभुणे, नयना तारू, सुप्रिया नितीन व सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलचा परिसर १५ ऑगस्टला देशभक्तीच्या गीतांनी आणि तिरंग्याच्या अभिमानाने दुमदुमून गेला. ७९वा स्वातंत्र्यदिन शाळेत उत्साहात, जल्लोषात व संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी शाळेला डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील दहीवळे, भारतीय नौदलातील अधिकारी श्री. आनंद काकडे, भारतीय थलसेनेतील ए.एस.ओ. सोमनाथ गोरे तसेच विश्वस्त डॉ. अशोककुमार पगारिया यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय सेवेसाठी नवचैतन्य निर्माण झाले. सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतातील विविधतेचे दर्शन घडवणारे लोकनृत्य, हृदयस्पर्शी देशभक्तिपर गीते आणि प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांत देशप्रेमाची ज्वाला प्रज्वलित केली. शाळेतील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात…

Read More

आयोजक : विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रावणातील शेवटच्या सोमवारी शहरात प्रथमच भव्य महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने श्री नागेश्वर शिव मंदिर, एस. के. एफ. कॉलनी चिंचवड येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. काशी येथील विद्वान पंडितांच्या पाऊपौरोहित्याखाली हिमालयातील 1001 औषधी वनस्पतींचा वापर करून हा दुर्मिळ व पवित्र महारुद्राभिषेक उद्या १७ ऑगस्टला दुपारी 12 ते ६ या वेळेत पार पडेल. यानंतर सायंकाळी ६ वाजता महाआरती व 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. “या दिव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा,” असे आवाहन…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकडून फोडली जाणारी उन्न’ती’ ची दहीहंडी प्रथमच मोठ्या उत्साहात पार पडली. तत्पूर्वी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या निमित्ताने ५६ भोग प्रसाद श्रीकृष्णाला अर्पण करण्यात आला. पारंपरिकरित्या पुरुषांकडून फोडली जाणारी दहीहंडी महिलांच्या पुढाकारातून आयोजित होऊन सामाजिक परिवर्तनाचा अनोखा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. छोट्या मुलीकरवी उन्न’ती’ ची दहीहंडी फोडण्यात आली. या सोहळ्या मागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे म्हणाल्या, “ उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी स्वतःहून हाती घेतलेला हा उपक्रम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबीर .आरोग्य शिबीर ,वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला. विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक बांधकाम व्यासायिक अशा विविध कार्यक्षेत्रातील सन्माननीय तसेच रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील ज्येष्ठ व सामान्य नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती . यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे ,आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार अमित गोरखे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार अश्विनीताई जगताप ,शिवसेना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळा कडून अत्यंत उत्साही आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती शाळेतील शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ पार पडला. या वेळी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली. कार्यक्रमानंतर, आकुर्डी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सरस्वती शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व परिसरातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

Read More