ताज्या घडामोडीपिंपरी
आकुर्डी येथील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळा कडून ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
ध्वजारोहण, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप"

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळा कडून अत्यंत उत्साही आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती शाळेतील शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ पार पडला. या वेळी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली.
कार्यक्रमानंतर, आकुर्डी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सरस्वती शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व परिसरातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.













