- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत असून दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याची सातत्याने मागणी करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना केंद्र सरकारने लेखी पत्र दिले आहे. रेल्वे ट्रकच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी बारा ते तीन या वेळेत लोकल सुरु करणे शक्य नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कळविले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना साथ सुरू होण्यापूर्वी पुणे-लोणावळरदरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरू होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना २०४७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय उभारणार्या भारतीय आणि मराठी उद्योजकांचे योगदान उल्लेखनीय असेल असा विश्वास भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) च्या वतीने दुबई येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सत्रात पीसीयूचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, अल अली ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक दुबईचे एच.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2025 रोजी पिंपरी-चिंचवडच्या निगडी भागात बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर लाईन दुरुस्तीच्या कामात असलेल्या तीन मजुरांचा डकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना समजताच कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या प्रकरणात तातडीने पुढाकार घेतला. 18 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी निगडी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांनीही बीएसएनएलकडून सहकार्य न मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर डॉ. कांबळे यांनी आकुर्डी व चिंचवड येथील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी आणि पवना नद्यांमधून दररोज पिंपरी-चिंचवड शहरासाठी 500 ते 600 एमएलडी पाणी उचलले जाते. सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे नदी प्रदूषणावर उपाययोजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांत पीएमआरडीए क्षेत्रात झपाट्याने नागरीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले असून, त्याचा थेट परिणाम इंद्रायणी व पवना नदीच्या प्रदूषणावर झाला आहे. अनेक ठिकाणी विना प्रक्रिया सांडपाणी आणि रसायनमिश्रित औद्योगिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ’अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’ मिळाला. या दहीहंडी महोत्सवाची सुरवात चिंचवडगावातीलच श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाच्या ‘शिवोदय’ या पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली. नवी मुंबई येथील गोविंद पथक, मुंबई चेंबूर मधील ‘शितळादेवी’ गोविंदा पथक, मुंबई गोवंडी येथिल ‘लुंबिनीबाग’ गोविंदा पथक येथिल गोविंदा पथकाने चित्तथरारक कसरंतीचे प्रदर्शन व स्पर्धा करीत सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटी चेंबूरच्या ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला.दहिहंडी महोत्सवाचे संयोजक अॅड. मोरेश्वर शेडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव निगडी भक्ती-शक्ती चौक येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबई, ठाणे, चाकण, चेंबुर या ठिकाणांहून तब्बल १२ गोविंदा पथकांनी सलामी देत उपस्थिती लावली. या सोहळ्यात चेंबूरच्या ‘क्रेझी इगल गोविंदा’ पथकाने तब्बल सात थर रचून दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. या सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, माथाडी कामगार अध्यक्ष इराफभाई सय्यद, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी आराफत शेख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, नगरसेवक राहुलदादा कलाटे, मोरेश्वरभाऊ भोंडवे, सिद्धार्थ बनसोडे, कामगार सेना अध्यक्ष काशिनाथ नखाते, आरपीआय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यांमध्ये फेरीवाला घटकासाठी काम करणारी संघटना नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या संघटना बांधणीला गती आलेली असून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शाखा स्थापना सत्र सुरू आहे याचाच भाग म्हणून कृष्णानगर ,चिंचवड आणि चिखली परिसरामध्ये ३ शाखा चे ज्येष्ठ विक्रेत्यांचे हस्ते श्रीफळ फोडून आणि हार घालून आज उद्घाटन करण्यात आले. मोठ्या जल्लोषात विक्रेत्यांनी घोषणा देत शाखेची स्थापना केली आणि सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य अनुक्रमे राजू बिराजदार,किरण साडेकर, सलीम डांगे, किसन भोसले,अलका रोकडे, यांचे सह फ क्षेत्रीय अध्यक्ष बालाजी लोखंडे,राजू खंडागळे, नितीन सुरवसे,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जन्माष्टमी व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प अमोल महाराज जाधव यांचे जन्माचे कीर्तन झाले. रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिला मंडळ द्वारे पाळणा मान्यता आला व सुंठवाडा चे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कालची कीर्तन झाले. बारा वाजता गोपाळकाला करून श्री स्वामी समर्थ युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडण्यात आली. तसेच आरती होऊन कालचा प्रसाद सर्व भाविकांना वाटण्यात आला. दोन्ही कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाची…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने ७९ वा स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन सामाजिक कार्यकर्ते अण्णा अभंग यांच्या हस्ते करण्यात आले. तर, मौलाना आझाद स्पोर्टक्लबच्या वतीने साजरा केलेल्या स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण माजी महापौर आर एस कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, मौलाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे मौलाना खलील शेख, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, विजय शिनकर, किर्ती शहा , जिग्नेश पटेल, मेहमूद सय्यद, प्रवीण वाढीया, विनय पगारे , जायची खान आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे. १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये दर्जेदार व शिक्षणासाठी पोषक वातावरण असल्याचे श्रावणीच्या निवडीने सिद्ध झाले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. श्रावणी आता अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे. तसेच या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान,…
