शिवतेज नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जन्माष्टमी व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प अमोल महाराज जाधव यांचे जन्माचे कीर्तन झाले. रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महिला मंडळ द्वारे पाळणा मान्यता आला व सुंठवाडा चे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कालची कीर्तन झाले. बारा वाजता गोपाळकाला करून श्री स्वामी समर्थ युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडण्यात आली. तसेच आरती होऊन कालचा प्रसाद सर्व भाविकांना वाटण्यात आला. दोन्ही कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाची नियोजन मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, दीपक पाटील, हरि नारायण शेळके राजू गुणवंत इ केले. श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, सेवेकरी मंडळ, भजनी मंडळ, युवा मंच आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.













