Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर प्रभागात वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शरदनगर स्पाईन रोड स्वामी विवेकानंद भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव पालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुयारी मार्गाच्या समस्यांवर नागरिकांची नाराजी शरदनगर, घरकुल, कोयनानगर, महात्मा फुले नगर, शिवाजी पार्क या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग बांधण्यात आला. मात्र, पूर्ण झाल्यानंतर लगेचच तो अपयशी ठरल्याच्या चर्चांना…

Read More

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध यंत्रणांमार्फत उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबव‍िण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. गुरुवारी त्यांनी औंध कार्यालयात विविध प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत तातडीने अपेक्षित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पुणे शहरासह इतर काही भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठोस पावले उचलली जात आहेत. हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यासह रिंग…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राम नगर चिंचवड येथे कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान व तसेच अजय काळभोर युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने गोपाळ भक्तांनी या सार्वजनिक उत्सवाला हजेरी लावली, तसेच उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दहीहंडी उत्सवाला प्रमुख आकर्षण होते सिनेतारका शिवाली परब (फेम – हास्य जत्रा) हे होते.यावेळी अनुप मोरे (महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा), युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, अजित शितोळे,(अध्यक्ष आकुर्डी व्यापारी संघटन), महेश काटे(सामाजि कार्यकर्ते),संदिप चिंचवडे(सामाजिक कार्यकर्ते),भाऊसाहेब भोईर(मा. विरोधी पक्षनेते), प्रसाद(भाई)शेट्टी(माजी नगरसेवक), काळुराम पवार(माजीनगरसेवक),मारुती भापकर (माजी नगरसेवक),विशाल काळभोर(कार्याध्यक्ष रा.काॅ.पा शरद पवार गट पिं.चिं.), माऊली सुर्यवंशी (सामाजि कार्यकर्ते)मान्यवर पाटीलबुवा चिंचवडे.…

Read More

पिंंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी जप्ती मोहिम हाती घेतली आहे. नुकतीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी मालमत्ता कर आकारणी व वसुली विषयक आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आणि सहायक आयुक्तांनी थकबाकीदारांच्या वसुलीबाबत पहिल्या टप्प्यात ५ लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती मोहिम राबविण्याबाबत सूचना दिल्या. २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जप्तीची कारवाई राबवली जाणार असल्याचे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. शहरात ५ लाखांवरील एकूण ६९९…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी परिसरातील पवना नदी काठ परिसराची पाहणी करून महापालिका प्रशासन आणि नागरिकांना सूचना दिल्या. त्रिभुवन यांनी पवना नदीच्या काठावर असलेल्या पवनानगर, गंगानगर, रहाटणी गावठाण आणि श्री शंकर मंदिर परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार आणि आरोग्य अधिकारी गणेश राजगे उपस्थित होते. नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकप्रिय भारताचे तत्कालीन सातवे पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंती व राष्ट्रीय सदभावना दिना निमित्त ( दि. २०) राजीव गांधी प्रतिष्ठान तर्फे हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांना पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संदेश नवले म्हणाले, “स्व. राजीव गांधींच्या स्मृती प्रित्यर्थ १९९२ पासून ” स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहर , पुणे ” हे गेली बत्तीस वर्षे सातत्याने प्रतिवर्षीच्या ‘ २० ऑगस्ट ‘ २०२५ रोजी स्व. राजीव गांधींच्या जयंती आणि राष्ट्रीय सद्भावना दिनाच्या औचित्यावर सामाजिक एकोपा व सौहार्दतेसाठी कार्य करणाऱ्या…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सावित्रीबाई फुले…

Read More

केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील सध्याचा सर्वात संवेदनशील असलेला मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संतांच्या भूमीत मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. काळेवाडी येथील इंदू लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना नानासाहेब जावळे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली. याप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, केंद्रिय सहकार्यध्यक्ष भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज आण्णा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरण येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम करत असताना झालेल्या एका भीषण दुर्घटनेत तीन कष्टकरी मजुरांचा— रमेश पवार, संतोष यादव आणि महेश खांबे—यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाख रुपये नुकसानभरपाई आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे लढवय्या नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केली आहे. ही मागणी मजुरांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय आणि आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित होईल. या गंभीर प्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने सातत्याने…

Read More

भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून व्याजासह रक्कम वसूल करा – काळुराम पवार पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. पुढील दोन आठवड्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून हडप केलेली रक्कम व्याजासह वसूल करावी आणि या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या ठेकेदारांना काळया यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी संतोष तेलंग, किरण तेलंग, जितेंद्र ननावरे, गणेश शिंदे, तेजस आगमने, आनंद भिल्ला, मयूर…

Read More