कै. विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान व अजय काळभोर युवा मंचतर्फे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा”

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राम नगर चिंचवड येथे कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान व तसेच अजय काळभोर युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने गोपाळ भक्तांनी या सार्वजनिक उत्सवाला हजेरी लावली, तसेच उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दहीहंडी उत्सवाला प्रमुख आकर्षण होते सिनेतारका शिवाली परब (फेम – हास्य जत्रा) हे होते.यावेळी अनुप मोरे (महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा), युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, अजित शितोळे,(अध्यक्ष आकुर्डी व्यापारी संघटन), महेश काटे(सामाजि कार्यकर्ते),संदिप चिंचवडे(सामाजिक कार्यकर्ते),भाऊसाहेब भोईर(मा. विरोधी पक्षनेते), प्रसाद(भाई)शेट्टी(माजी नगरसेवक), काळुराम पवार(माजीनगरसेवक),मारुती भापकर (माजी नगरसेवक),विशाल काळभोर(कार्याध्यक्ष रा.काॅ.पा शरद पवार गट पिं.चिं.), माऊली सुर्यवंशी (सामाजि कार्यकर्ते)मान्यवर पाटीलबुवा चिंचवडे.
(भाजपा महा.प्रदेश सदस्य),राजेंद्र चिंचवडे (अध्यक्ष,व्यापारी आघाडी भाजपा पिं.चिं.), शेखर आण्णा चिंचवडे,(उपाध्यक्ष, भाजपा पिं.चि.शहर),वैशाली काळभोर(माजी नगरसेवीका),डिंपल जैन(सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होते.
कै.विलास(आप्पा) काळभोर प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी फोडण्याचा मान झित्राई देवी गोविंदा पथक चाकण, झित्राई मळा यांना मिळाला. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रामनगर आकुर्डी येथे कै विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठान वतीने दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. मराठी व हिंदी सिनेतारकांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष रंगत लाभली. यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर विशेष भर देण्यात आला होता.
पारपरिक नृत्य,मंडप, एलईडी रोषणाई, ध्वनियंत्रणा आणि गोविंदांच्या थरारक कसरतींनी उत्सवात रंगत आणली. पिंपरी-चिंचवड शहर, आकुर्डी, पुणे जिल्हा या ठिकाणी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवर यांना आयोजक सामाजिक कार्यकर्ते अजय विलास काळभोर तसेच मित्रपरिवार उत्सवानिमित्त सामाजिक भान राखून आर्थिक मदत करण्यात आली त्यात एम ऐ हुसेन . YCM हॉस्पिटल मध्ये गोरगरीब सेवा करतात, मदन वाणी सेवेतून निवृत्त झाल्यावर आपल्या रिक्षा ने गोरगरीब मोफत सेवा करतात व इतर संस्थांना करण्यात आली.
त्या वेळेस कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.















