आळंदीताज्या घडामोडीपिंपरीपुणे

आळंदीत छोटे माऊली उर्फ ज्ञानेश्वर कदम महाराज यांना मानपत्र प्रदान

राजीव गांधी प्रतिष्ठानचा उपक्रम

Spread the love

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकप्रिय भारताचे तत्कालीन सातवे पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंती व राष्ट्रीय सदभावना दिना निमित्त ( दि. २०) राजीव गांधी प्रतिष्ठान तर्फे हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांना पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संदेश नवले म्हणाले, “स्व. राजीव गांधींच्या स्मृती प्रित्यर्थ १९९२ पासून ” स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहर , पुणे ” हे गेली बत्तीस वर्षे सातत्याने प्रतिवर्षीच्या ‘ २० ऑगस्ट ‘ २०२५ रोजी स्व. राजीव गांधींच्या जयंती आणि राष्ट्रीय सद्भावना दिनाच्या औचित्यावर सामाजिक एकोपा व सौहार्दतेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास ” जीवन गौरव पुरस्कार ” देवून सन्मानित करण्यात येते.

या वर्षी हा पुरस्कार वारकरी संप्रदायातील अव्याहत सेवाकार्याच्या माध्यमातून सकल संतांचे समाजहितैषी व्यापक विचारच प्रसृत करत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेदभ्रम अमंगळ | ही भूमिका घेत, वैष्णव धर्मात माणूस-माणसातील भेदभाव किंवा भेदभावाचा भ्रम अमंगल मानत, सर्व जीवांबद्दल प्रेमभावच ठेवण्याचा उपदेश देत सामाजिक एकोपा व सौहार्दतेचे जे वंदनीय कार्य करत आहेत. असे छोटे माऊली अर्थात ज्ञानेश्वर महाराज कदम यांना प्रदान करण्यात आला आहे.

स्व. राजीव गांधींच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी साजऱ्या करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सद्भावना दिनाच्या उद्देशाशी आम्हांला सुसंगत असणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, संत तुकाराम महाराज पगडी, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन प्रतिमा, तिरंगा उपरणे व संविधान प्रत असे होते. या वेळी हभप शशिकांत नवले, तुकाराम डफळ, हिरामण देवकर, सामाजिक कार्यकर्ते संदेश नवले, प्रतीक नवले उपस्थित होते. विजय बोत्रे पाटील यांनी मानपत्र लेखन व सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button