- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यम हे आजच्या काळातील संपर्काचे एक अद्भुत साधन आहे. चिंचवडगावातील काकडे पार्कमधील रहिवाशी असलेल्या रमेश कुलकर्णी व पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप समूह तयार केला. त्यानंतर सातत्यपूर्ण संपर्कातून पिंपरी – चिंचवड, पुणे, कराड आणि कोल्हापूर येथे स्थायिक झालेल्या या शालेय मित्रांच्या दोन दिवसीय स्नेहमेळावा सन २०२६ चे आयोजन निसर्ग छाया, भूगाव, पुणे येथे रविवार व सोमवार दिनांक ०५ आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करधारकांसाठी राबवलेली ‘अभय योजना’ ३१ मार्च रोजी संपली असली, तरी तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे अनेक नागरिक या सवलतीपासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन, ही योजना आणखी एक महिना म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवून मिळावी, अशी आग्रही मागणी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय (महा. शासन) पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त अरुण श्रीपती पवार यांनी केली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन शहरातील सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी अरुण पवार यांनी खालील तिन्ही मान्यवरांना लेखी पत्र देऊन ही मागणी लावून धरली आहे: आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, भाऊसाहेब…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यापूर्वी हिंजवडी – माण भूगाव – पिरंगुट परिसरातील पाहणी दौरा करण्याची मागणी भोर मुळशी राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे केली. आमदार शंकर मांडेकर यांनी आज मतदारसंघातील विविध रस्ते कामे व प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची तसेच मुख्य अभियंता रिनाज पठाण, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. शिवप्रसाद बागडी तसेच नगररचना अधिकारी अस्मिता कलकुटकी, वन अधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पावसाळ्यापूर्वी आयुक्त डॉ. अभिजीत…
महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सन्मानपूर्वक माध्यान्ह भोजनासाठी प्लेट्सचे वाटप चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन अधिक स्वच्छ व सन्मानपूर्वक मिळावे या उद्देशाने प्लेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चिंचवड प्रभागातील नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वितरण करण्यात आले. हुतात्मा चापेकर प्राथमिक विद्या मंदिर व केशवनगर प्राथमिक शाळा, चिंचवड या शाळेतील विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (मनपा) आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तब्बल ५० ते ५२ कोटी रुपयांच्या बिल वितरणावरून लेखा विभागावर गंभीर आरोप होत आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांना देयके अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार, सन २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पात संबंधित कामांसाठी कोणतीही तरतूद नसताना तब्बल ७० हून अधिक कामांची बिले काढण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेबाबत संबंधित विभागप्रमुखांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे समोर आले आहे. बोगस उपसूचना तयार करून आणि काही नगरसेवकांच्या कथित स्वाक्षऱ्यांचा आधार घेत हा व्यवहार झाल्याचीही…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येचे अखेर समाधान करण्यात आले आहे. या भागात नवीन (कमी दाबाच्या) जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या अल्पावधीत मार्गी लागली असून, आता नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. स्टार्ट-अप संस्था प्री-वाई (Pre-Vai) यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंपळे सौंदागर येथील लिनिअर गार्डन येथील सार्वजनिक सायकल शेअरिंग प्रकल्पाचे उद्घाटन नगरसदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे आणि विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसदस्या कुंदा भिसे, अनिता काटे यांच्यासह प्रभारी शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या…
पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेची सोडत संपन्न; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर! लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक प्रक्रिया; यशस्वी लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांकडून अभिनंदन आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एकूण १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८ एप्रिल) अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. मानवरहित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेतून स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थित अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृहातील वातावरण भावूक झाले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता…
‘ सायबर सुरक्षित भारत धडविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा : डॉ. दीपक शहा चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिचवड येथील ‘प्रतिभा वाणिज्य आणि संगणक अध्ययन महाविद्यालया’ने सायबर सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा” या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सायबर क्लबने उत्कृष्ट प्रदर्शन करत “सर्वोत्कृष्ट सर्वंकष ( ओव्हर ऑल ) सायबर क्लब” या गटात द्वितीय उपविजेतेपद पटकावण्याचा बहुमान मिळवला. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. या स्पर्धेत विविध राज्यांतील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर क्लबने सातत्यपूर्ण प्रयत्न,…
