महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सन्मानपूर्वक माध्यान्ह भोजनासाठी प्लेट्सचे वाटप
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन अधिक स्वच्छ व सन्मानपूर्वक मिळावे या उद्देशाने प्लेट्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत चिंचवड प्रभागातील नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वितरण करण्यात आले. हुतात्मा चापेकर प्राथमिक विद्या मंदिर व केशवनगर प्राथमिक शाळा, चिंचवड या शाळेतील विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
माननीय शंकरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
आपलाच जनसेवक
*सुरेश शिवाजी भोईर*
*नगरसेवक पिं

