Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरणपूरक उत्सवाबरोबरच जनजागृतीचा संदेश देणारा “मोबाईल व्यसनमुक्ती” हा देखावा इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट येथे गणेशोत्सवात सादर करण्यात आला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी गणेश मूर्तीसमोर मोबाईल व्यसनमुक्ती संदर्भातील देखावे ठेवले आहेत. तसेच मोबाईल व्यसनमुक्तीवर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या अध्यक्षा पद्मा भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला आहे. यावर्षी उत्सवासाठी मूर्ती ही वर्तमानपत्रांच्या लगद्यापासून संस्थेच्या जावेद हबीब…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु स्वरांजली अविनाश चव्हाण (इयत्ता 5 वी) हिने सामान्य परीक्षेमध्ये 300 पैकी 286 गुण प्राप्त करून राज्यस्तरीय मेरिटमध्ये 8 वा क्रमांक प्राप्त केला व सातारा जिल्ह्यात 3 रा क्रमांक प्राप्त केला तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव,संचालक विजय जाधव, उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, प्राथमिक पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य, छाया ओव्हाळ, मनीषा जाधव अमोल पाटील, सपना सावेडकर आदी उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड शहरातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने महत्त्वपूर्ण वचन दिले आहे. शहरात येत्या काळात स्टार्टअप्स आणि महापालिकेच्या माध्यमातून तब्बल २०,००० रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष रवीराज बबन काळे यांनी जाहीर केले. रोजगार हा प्रत्येक तरुणाचा मूलभूत हक्क असून, आत्मनिर्भरतेसाठी संधी निर्माण करणे हे आम आदमी पक्षाचे प्राधान्य असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असून येथे युवक-युवतींना रोजगाराच्या भरपूर संधी मिळायला हव्यात. मात्र, आतापर्यंत इथल्या तरुणांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शहरातील कौशल्य, स्टार्टअप संस्कृती आणि महापालिकेच्या सहकार्याने रोजगाराचे केंद्र उभारण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहरात २०,००० नवीन रोजगार…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी, शेगावीचा राणा श्री गजाननमहाराजांची पुण्यतिथी आणि कलावतीदेवी यांची जयंती या मंगलदिनांचे औचित्य साधून, दोन्ही गुरूंना वंदन करून गांधीपेठ महिला मंडळात गणपती बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण मंगलदायी वातावरणात संपन्न झाले. अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात कस्तुरी जमखंडी आणि प्रभावती इंदलकर यांनी केली. गणपतीसाठी शंखवादन सेवा आणि अथर्वशीर्ष आरती सविता दुमडे, प्रांजली पानसे यांनी केली. अथर्वशीर्ष पठणास गांधीपेठ महिला मंडळातील माया थोरात, शैला जमखंडी, रेश्मा जमदाडे, अश्विनी थोरात, कविता गोलांडे, सुजाता गोलांडे, चंद्रकला शेडगे, रत्नमाला बोरकर, मंगल नेवाळे, सिद्धी नेवाळे, हेमा सायकर, मंदाकिनी चोपडे, मंडळाच्या अध्यक्ष गीतल गोलांडे आणि गांधी पेठ महिला मंडळाच्या अन्य…

Read More

देहूरोड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन तसेच विद्युत विषयक कामांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी देहूरोड छावणी परिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली रावत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. आमदार शेळके यांनी नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनास ठोस उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांना भौतिक सोयी–सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना वेळमर्यादा निश्चित करून काम पूर्ण करण्यास भाग पाडावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यावेळी रावत यांनी माहिती दिली की येत्या काही दिवसांत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंध्र प्रदेश राज्यातील विविध महापालिका व संस्थांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी करताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरणपूरक धोरणांबद्दल समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळात तडीपात्री महापालिकेचे आयुक्त एस. शिव रामकृष्णा, विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. एन. व्ही. नरेशकुमार, कार्यकारी अभियंता के. गुरप्पा यादव, कार्यकारी अभियंता एम. नारायण स्वामी, तांत्रिक तज्ज्ञ श्रीनिवास रेड्डी, वरिष्ठ प्रकल्प सहकारी (सीडीएमए) एम. डी. जावेद आणि प्रकल्प सहकारी (स्वच्छ आंध्र कॉर्पोरेशन) एस. डी. रहतुल्लाह यांचा समावेश होता. यासर्वांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर चव्हाट्यावर आला असून, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘जम्बो’ कार्यकारिणीतील शहर उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी अवघ्या २४ तासांतच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या १२६ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत हिंगे यांचा समावेश करण्यात आला होता. वैयक्तिक कारण की अंतर्गत नाराजी? तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये “वैयक्तिक कारणामुळे” हा उल्लेख केला असला, तरी राजकीय वर्तुळात हे स्पष्टपणे गटबाजीमुळे निर्माण झालेल्या असमाधानाचेच प्रतिबिंब मानले जात आहे. आपल्या राजीनामापत्रात हिंगे यांनी म्हटले आहे की, “मी, तुषार रघुनाथ हिंगे, कालच माझी पिंपरी चिंचवड शहर…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही श्री. पाटील म्हणाले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. येथे आज सायंकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महापालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, खजिनदार नितीन सनगीर यांच्यासह सनी कदम, विशाल भुजबळ, अभिषेक फुगे, विश्वनाथ लांडगे, दत्ता ढगे, ईश्वर आठवल, गणेश…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी…

Read More