चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
राज्यस्तरावरील सामान्य परीक्षेत स्वरांजली चव्हाण यांची उल्लेखनीय कामगिरी – 8 वा क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु स्वरांजली अविनाश चव्हाण (इयत्ता 5 वी) हिने सामान्य परीक्षेमध्ये 300 पैकी 286 गुण प्राप्त करून राज्यस्तरीय मेरिटमध्ये 8 वा क्रमांक प्राप्त केला व सातारा जिल्ह्यात 3 रा क्रमांक प्राप्त केला तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव,संचालक विजय जाधव, उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, प्राथमिक पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य, छाया ओव्हाळ, मनीषा जाधव अमोल पाटील, सपना सावेडकर आदी उपस्थित होते.















