- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था , मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी घाटावर गणपती मूर्तीदान करा!असा संदेश पथनाट्यातून देऊन जनजागृती करण्यात आली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी,अरुण परदेशी यांनी पथनाट्यात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पालिका क्षेत्रात नदी घाटावर पाण्याचे हौद तयार केले आहेत. त्याच ठिकाणी गणेश विसर्जन सर्वांनी करावे हा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले.. ” श्री चे विसर्जन पाच, सात, नऊ आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मोठ्या प्रमाणात होते.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या १६ वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राजश्री जायभाय यांनी आपले जिल्हा कार्यकारिणी सदस्य पद सोडत अंतर्गत असंतोषाला वाचा फोडली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात जायभाय यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत सांगितले की, ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्या कार्यकर्त्यांना पदे दिली जात आहेत. यामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. “मी पक्षासाठी निष्ठेने काम करत राहणार आहे, परंतु या अपमानानंतर मी पद स्वीकारू शकत नाही,” असे त्यांनी नमूद करत राजीनामा जाहीर केला. या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादावर…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या गांधीपेठ, चिंचवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळचा ‘चिंचवडचा राजा’ यांनी गोरक्षा संवर्धन आणि संरक्षणाचा अतिशय प्रभावी संदेश देणारा ‘जागर गोमातेचा’ हा जिवंत देखावा साकारला आहे. शाहीर आसराम कसबे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या जिवंत देखाव्यात गणेश कांबळे, शिवाजी पोळ, सार्थक कसबे, लखन जगताप, विशाल भवारी आणि स्वतः आसराम कसबे हे कलावंत हृदयाला भिडणारे संवाद व संगीतमय गीतांमधून गाईचे सर्वतोपरी महत्त्व सांगत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांनी सांगितले की, ‘आपल्या भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ पशू नसून तिला आईचा दर्जा दिला आहे. देशी गाईचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड चे अध्यक्ष डॉ. मनिष कुमार व उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) यांचेकडे प्रदान केले. यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्र. प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे आदी उपस्थित होते. या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आली आली गौर आली, सोन्याच्या पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली…’ असे म्हणत पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरी रविवारी (दि. ३१) पारंपरिक पद्धतीने सोनपावलांनी वाजतगाजत गौरींचे आगमन झाले. अनुराधा दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच गृहिणींची लगबग सुरू होती. रांगोळीचा सडा अन् लक्ष्मीची पावले काढत गौरींचे स्वागत केले.श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर महिलांना गौरी आगमनाचे वेध लागतात. घराघरात रविवारी सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत गौरी आवाहन केले. माता गौरीला शुद्ध पाण्याने स्नान घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरविले, त्यावर गौरी विराजमान केल्या. त्यानंतर गौरीला सोळा अलंकार केले. त्यानंतर गौरीच्या कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षदा लावून प्रतिष्ठापना केली. दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या, कोशिंबीर,…
काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडीतील श्री साईनाथ तरुण मंडळ यंदा आपला ५० वा वर्षपूर्ती सोहळा म्हणजेच सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात आणि समाजसेवेच्या विविध उपक्रमांनी साजरा करत आहे. या विशेष वर्षात मंडळाने सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवत स्पंदन बालश्रमातील अनाथ मुलांच्या हस्ते श्रींची आरती करून एक आगळीवेगळी परंपरा प्रस्थापित केली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पंदन बालश्रमच्या विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर श्री दिलीप सोनीगरा आणि श्री प्रीतम संघवी यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. कार्यक्रमावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश लंगोटे, स्पंदन बालश्रम संस्थेचे गणेश म्हसके, यशवंत नामदे, तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी आगमनाच्या दिवशी, निसर्ग हीच खरी देवता या भावनेतून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची गोळी या संस्थांच्या वतीने ‘खिळे मुक्त झाडं’ उपक्रम राबवण्यात आला. चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमध्ये या उपक्रमाअंतर्गत वीस झाडांवरून खिळे आणि स्टेपलरच्या पिना काढून त्या झाडांना मुक्त करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांनी सांगितले की, “झाडांनाही जीव असतो, आपण तुळशीला दररोज पाणी घालतो, तशीच झाडांचीही काळजी घेतली पाहिजे. झाडांना खिळे ठोकून इजा करणे चुकीचे आहे.” या उपक्रमात महिलांनी झाडांची पूजा केली, आरती म्हणाली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमात उर्मिला चवरे, अनिता धाक्रस, जयश्री वीरकर, कमल टोणगे, अजित जाधव तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विचारांचा पुढचा टप्पा म्हणजे विवेक होय. प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य, अयोग्य याची परिभाषा बदलत असते. त्यामुळे प्रत्येक घटनेत प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. म्हणजेच विचारांची पुढची पायरी ही विवेक आहे. हा विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ हे उत्कृष्ट माध्यम आहे, असे विदुषी धनश्री लेले यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लेले यांच्या हस्ते अध्याय पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘वन्हि तो चेतवावा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी,प्रकाशक अनिल आठलेकर, सज्जनगड संस्थानचे अजेय बुवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसंपर्क व संवाद माध्यम असलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२५ वा भाग आज पिंपरी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम विशेष ठरला कारण नव्याने निवड झालेले भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या प्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तुषारजी हिंगे, प्रदेश सचिव अजितजी कुलथे, भाजयुमोचे पूर्व शहराध्यक्ष राज तापकीर, संकेत चोंधे तसेच भाजयुमोचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. युवा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, टाळ्यांचा गजर आणि…
वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संतुलन जपण्यासाठी मावळ तालुक्यात आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या कराराअंतर्गत मावळ तालुक्यातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरातील विदेशी जंगली वृक्ष काढून टाकले जाणार असून त्यांच्या जागी भारतीय स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड केली जाणार आहे. का काढले जाणार आहेत विदेशी वृक्ष? गेल्या काही दशकांत रानात मोठ्या प्रमाणावर विदेशी जातींची झाडे (जसे की सबबाबूल, ग्लिरिसीडिया इ.) वाढली आहेत. या झाडांमुळे स्थानिक प्रजातींचा नायनाट होतो, पाणी शोषून घेण्याची क्षमता असंतुलित होते आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो.…
