उद्योगनगरीत सोनपावलांनी गौराईचे आगमन, महिलावर्गात उत्साह

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आली आली गौर आली, सोन्याच्या पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली…’ असे म्हणत पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरी रविवारी (दि. ३१) पारंपरिक पद्धतीने सोनपावलांनी वाजतगाजत गौरींचे आगमन झाले.
अनुराधा दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच गृहिणींची लगबग सुरू होती. रांगोळीचा सडा अन् लक्ष्मीची पावले काढत गौरींचे स्वागत केले.श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर महिलांना गौरी आगमनाचे वेध लागतात.
घराघरात रविवारी सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत गौरी आवाहन केले. माता गौरीला शुद्ध पाण्याने स्नान घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरविले, त्यावर गौरी विराजमान केल्या. त्यानंतर गौरीला सोळा अलंकार
केले. त्यानंतर गौरीच्या कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षदा लावून प्रतिष्ठापना केली. दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या, कोशिंबीर, चटण्या, पदार्थ गौरीला अर्पण करून गौरीची आरती केली जाते. अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते.
ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना अलंकार
परिधान करून सजावट, आज घरोघरी गौरीपूजन शनिवारी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. पारंपरिक पेहरावामध्ये नटून थटून सुवासिनींनी गौरींचे आवाहन करतात. कुलाचारानुसार
काही घरांमध्ये गौरींचे शाडूचे मुखवटे तर, काही घरांमध्ये पितळी मुखवटे बसवून गौरी बसविल्या आहेत.
काही घरांमध्ये गौरी आवाहनानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना अलंकार ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणं किंवा ओवसणं, ज्याला ववसा असंही म्हटलं जातं. या परंपरेद्वारे
घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो.
त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले
जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर सोमवारी (१ सप्टेंबर) गौरीपूजन होणार आहे. मंगळवारी (२ सप्टेंबर) मूळ नक्षत्र सकाळपासून रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असल्याने दिवसभरात केव्हाही गौरी विसर्जन करता येणार आहे. घरोघरी गौरी पूजन पार पडणार असून, या माहेरवाशिणींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. सातव्या दिवशी अनेक घरांमध्ये गौरींबरोबर गणपतीचेही विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार गौरी-गणपतींचे विसर्जन
केले जाईल.














