पिंपरी चिंचवडमध्ये ‘मन की बात’चा १२५ वा भाग उत्साहात पार; भाजयुमो शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पहिला कार्यक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसंपर्क व संवाद माध्यम असलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२५ वा भाग आज पिंपरी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम विशेष ठरला कारण नव्याने निवड झालेले भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तुषारजी हिंगे, प्रदेश सचिव अजितजी कुलथे, भाजयुमोचे पूर्व शहराध्यक्ष राज तापकीर, संकेत चोंधे तसेच भाजयुमोचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. युवा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, टाळ्यांचा गजर आणि आनंद व्यक्त करत शहराध्यक्ष दिनेश यादव यांचे स्वागत केले.
‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. विशेषत: ‘वोकल फॉर लोकल’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांबद्दल युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी युवा कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि येत्या काळात भाजयुमोच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील युवकांच्या विकासासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.













