Author: maharashtrabreakingnews.com

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाढत्या स्पर्धेच्या युगातील दैनंदिन जीवन जगत असतांना माणसांनी मुक्त होऊन जगावं… आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने योग्य जीवन शैलीचा वापर करावा… मात्र मुक्त होऊन व्यक्त व्हावं असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, शिवनेर भूषण, शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे सर यांच्या ७८ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना हभप पुरुषोत्तम महाराज पाटील बोलत होते. या प्रसंगी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालिका श्रीमती नीलमताई तांबे, सचिव वैभव तांबे, खजिनदार मयुर ढमाले,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाने यावर्षी गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले आहे. यामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक, शगुन चौक, चंद्रमणी कॉलनी सांगवी, तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ चौक या ठिकाणांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सांस्कृतिक कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले असून, येथे आकर्षक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन  अरुण चाबुकस्वार  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे उपप्राचार्य  सचिन कळसईत  व तात्या शिनगारे आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन विद्यार्थिनी त्रिवेणी जाधव व स्वराली शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. शेवटी आभारप्रदर्शन विद्यार्थी सोहम गायकवाड याने केले. कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली होती.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांच्या हातात शिकवण्यासाठी पुस्तकं, समोर ज्ञानग्रहण करण्यासाठी बसलेले अधिकारी… मुलांनी कल्पकतेने रंगवलेली चित्रं आणि त्यांच्या आवाजात घुमणारे धडे… विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न व त्याला उत्तरे देणारे अधिकारी… असे उत्साहपूर्ण, आनंददायी आणि अनुभवांनी भरलेले वातावरण शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘शिका आणि घडवा’ या अभिनव उपक्रमात अनुभवायला मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला हा उपक्रम शिक्षक दिनाला खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेत चालणाऱ्या कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने ‘शिका आणि घडवा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षक दिनाची पूर्व संध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी व मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश अखेर निर्गमित केले असून, १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि अनेक पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश दिले आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, समाजाचे भविष्य घडवणाऱ्या, आदर्श पिढी निर्माण करणाऱ्या गुरुजनांच्या पदोन्नतीचा विषय मंजूर व्हावा यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. हे शहरातील तमाम गुरुजनांना वंदन आहे, असे आमदार लांडगे म्हणाले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पुनावळे चौक, वाकड, भूमकर वस्ती या रस्त्याची मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत  8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची (उन्नत मार्ग) निर्मिती करण्यात येणार आहे. या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महिन्याभरात मान्यता मिळेल, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून मुंबई-बंगळुरू महामार्ग जातो. वाकड भूमकर चौक, ताथवडे व पुनावळेतील अंडरपास, किवळेतील मुकाई चौक आणि देहूरोड येथील सेंट्रल चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होते. ती…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. सलग तिस-या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मीती करण्यात आली आहे.…

Read More

प्रभाग रचनेबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची हरकत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेअंतर्गत मूळ प्रभाग क्रमांक 29 मधील साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर हा परिसर भौगोलिकदृष्ट्या मौजे पिंपळे गुरव ह्द्दीतील भाग असून, तो प्रभाग क्रमांक 32 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा भाग पुर्ववत करून तो प्रभाग क्रमांक 29 किंवा प्रभाग क्रमांक 31 मध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. राजेंद्र जगताप यांनी महापालिका निवडणूक विभागाला दिलेल्या हरकतीत म्हटले आहे, की नवीन प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या 49146 इतकी आहे. प्रभाग 32 ची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारपर्यंतच्या (दि. 4) मुदतीमध्ये एकूण 318 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी हरकतीचे अर्ज देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. तब्बल 276 हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्यातील सर्वांधिक हरकती व सूचना या प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर-शाहूनगर या प्रभागाच्या आहेत. निवडणूक कार्यालयात लागल्या रांगा महापालिकेने 22 ऑगस्टला चार सदस्यीय 32 प्रभागाची प्रारूप रचना जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. तसेच, महापालिका भवनातील पार्किंगमध्ये लावण्यात आले. प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारी दुपारी तीनपर्यंत हरकती व सूचना देण्याची मुदत होती. बुधवारपर्यंत (दि. 3) केवळ 42 हरकती प्राप्त…

Read More

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दसरा आणि दिवाळीची भेट गणेशोत्सवातच दिली. जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी खरेदी जोरदार होईल. विमांच्या प्रीमियमवर जीएसटी लागणार नाही. जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत ५% आणि १८% जीएसटी दरांना मंजुरी मिळाली. २२ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ट्रम्प टॅरिफमुळे बसणारा फटका या निर्णयामुळे कमी होईल. जीएसटी ०% वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा, नकाशे, चार्ट्स, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, खडू, रंगीत पेन्सिली, वह्या व नोटबुक्स, खोडरबर जीएसटी ५% केसांचे तेल, शॅम्पू,…

Read More