ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतीचा पाऊस, प्रभाग १० मधून सर्वाधिक हरकती व सूचना

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारपर्यंतच्या (दि. 4) मुदतीमध्ये एकूण 318 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी हरकतीचे अर्ज देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. तब्बल 276 हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्यातील सर्वांधिक हरकती व सूचना या प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर-शाहूनगर या प्रभागाच्या आहेत.

निवडणूक कार्यालयात लागल्या रांगा

महापालिकेने 22 ऑगस्टला चार सदस्यीय 32 प्रभागाची प्रारूप रचना जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. तसेच, महापालिका भवनातील पार्किंगमध्ये लावण्यात आले.

प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारी दुपारी तीनपर्यंत हरकती व सूचना देण्याची मुदत होती. बुधवारपर्यंत (दि. 3) केवळ 42 हरकती प्राप्त झाल्या होता. अखेरचा दिवस असल्याने हरकतीचे अर्ज देण्यासाठी महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात रांगा लागल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या हरकती दाखल केल्या. एका व्यक्तीकडून एकच हरकत किंवा सूचना स्वीकारण्यात आली.

ऑटो क्लस्टर येथे सुनावणी

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर मंगळवारपासून (दि. 9) सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात होणार आहे. एका प्रभागातील सर्व हरकती व सूचना देणार्यांना एकाच वेळी बोलविले जाणार आहे. ती सुनावणी शुक्रवारपर्यंत (दि. 12) चालणार आहे. राज्य शासनाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हे सुनावणी घेणार आहेत.

9 प्रभागांत एकही हरकत नाही

मुदतीपर्यंत एकूण 318 हरकती व सूचना महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वांधिक हरकती या प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर-शाहूनगर येथील आहेत. प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, मोरेवस्ती संदर्भात 98 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर, प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगर, कासारवाडी, पिंपरीबाबत एकूण 31 हरकती आहेत.

प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्ती, गुळवेवस्ती बाबत 15 हरकती देण्यात आल्या आहेत. इतर प्रभागांसाठी हरकतीची संख्या एक आकडी आहे. तर, प्रभाग क्रमांक 5, 13, 15, 16, 17, 18, 25, 27 आणि 28 बाबत एकही हरकती देण्यात आलेली नाही. तर, एक हरकत सर्वसाधारण आहे.

सहा ऑक्टोबरला प्रभागरचना अंतिम होणार

हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. सुनावणी 9 ते 12 सप्टेंबर असे 4 दिवस चालणार आहे. नियुक्त केलेल्या अधिकार्यांकडून त्या संदर्भातील अंतिम अहवाल नगरविकास विभागाला 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत सादर केला जाणार आहे.

त्यानंतर तो अहवाल 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर अंतिम प्रभागरचना 3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध केला जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.

पिंपरीबाबत 29 अर्जदारांची एकसारखी हरकत

प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, मोरेवस्तीसंदर्भात 86 अर्जदार व 12 अर्जदारांचे हरकती एकसारख्या आहेत. प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर-शाहूनगरमध्ये 52 अर्जदार, 38 अर्जदार आणि 22 अर्जदारांची हरकत एकसमान आहेत. प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगर, कासारवाडी, पिंपरीबाबत 29 अर्जदारांची हरकत एकसारखी आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवर महापालिकेस प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी प्रक्रिया मंगळवारपासून (दि. 9) सुरू करण्यात येणार आहे. ती शुक्रवारपर्यंत (दि. 12) चालणार आहे. प्रभागाच्या आलेल्या हरकती तपासून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार, वेळापत्रक बनविले जाईल. अर्जदारांना मोबाईलवर तसेच मेलद्वारे त्यांच्या सुनावणीची वेळ कळविली जाणार आहे.

– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button