ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग रचनेबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची हरकत

Spread the love

प्रभाग रचनेबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची हरकत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेअंतर्गत मूळ प्रभाग क्रमांक 29 मधील साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर हा परिसर भौगोलिकदृष्ट्या मौजे पिंपळे गुरव ह्द्दीतील भाग असून, तो प्रभाग क्रमांक 32 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा भाग पुर्ववत करून तो प्रभाग क्रमांक 29 किंवा प्रभाग क्रमांक 31 मध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
राजेंद्र जगताप यांनी महापालिका निवडणूक विभागाला दिलेल्या हरकतीत म्हटले आहे, की नवीन प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या 49146 इतकी आहे. प्रभाग 32 ची लोकसंख्या 54614 इतकी आहे. तर प्रभाग क्र. 31 ची लोकसंख्या 51849 इतकी आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेत साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर हा परिसर प्रभाग क. 32 मधून वगळून प्रभाग क्र. 29 किंवा 31 मध्ये समाविष्ट करण्यात यावा. ज्यामुळे या तिन्ही प्रभागांची लोकसंख्या एकसमान होईल.
सध्या या भागातील नागरीकांना कचर्‍याची गाडी, स्ट्रिट लाईट, गतिरोधक टाकणे, चेंबर तुंबणे, पदपथ व त्यावरील ब्लॉक बसविणे अशा अनेक कामांमध्ये विलंब होत आहे, त्यामुळे नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रभाग रचनेत बदल करणे गरजेचे आहे.

नवीन प्रभाग रचना :
प्रभाग 29 : कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, श्रीकृष्णनगर, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, वैदुवस्ती इत्यादी.

प्रभाग 31. भाग 1- राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, कीर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, मयूरनगरी,रामनगर, गांगार्डेनगर भाग, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, स्वामी विवेकानंद नगर, समतानगर, राजारामनगर, ढोरे पाटील ङ्गार्म, सीएमई कॉलनी, संत तुकाराम नगर, आनंद पार्क भाग, ऊरो रुग्णालय.

प्रभाग 32. सांगवी गावठाण, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमालानगर, उष:काल सोसायटी, पवनानगर, संगमनगर,प्रियदर्शनीनगर, पी डब्ल्यू डी. कॉलनी, एस.टी कॉलनी, ममतानगर, शितोळेनगर, पुष्पापार्क, कृष्णानगर, साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर हा परिसर हा भौगोलिकदृष्ट्या मौजे पिंपळे गुरव ह्द्दीत येत आहे. नवीन प्रभाग रचनेत या शिवदत्तनगर, इत्यादी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button