- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १९ सेवा सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहे. नागरिकांना शासकीय सेवा / कामे घरबसल्या ऑनलाईन करता यावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून संबंधित सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. आठवड्याभरात यात १० नवीन सेवांची भर पडणार असून नागरिकांना पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांचा लाभ ऑनलाईन घेता येणार आहे. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षक दिनाच्या औचित्याने प्रबोधन प्रतिष्ठान, दापोडी, पुणे यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या ऐतिहासिक ग्रंथाचे पुस्तक देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सिटी प्राईड इंग्लिश स्कूल रहाटणीचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, प्रा. सिध्दार्थ कांबळे (सि.के. गोयळ कॉलेज, दापोडी), ॲड. महेश लोहारे (संचालक आर.आय.बी. संस्था, पिंपरी-पुणे), पत्रकार यशपाल सोनकांबळे, प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रा. गोरख ब्राह्मणे, तसेच रायगड भूषण संपादक डॉ. रविंद्र विष्णू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज ला तन्मय पब्लिकेशन आणि सप्तरंग सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडियन स्कूल एक्सलन्स अवार्ड” पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाशी असलेले योगदान यासाठी या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची ची शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत झाली असून संस्थेच्या शिक्षणाच्या दर्जात सातत्याने सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे. महाविद्यालयाने नवोन्मेषी शिक्षण पद्धती, डिजिटल शिक्षण साधने, कौशल्यविकास कार्यशाळा आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून या घटकांच्या सर्वांगीण कल्याण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख नारायण कुचे यांनी दिले. महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती पुणे जिल्हा दौऱ्यावर आहे. आज या समितीची पिंपरी चिंचवड महापालिकेत बैठक पार पडली. यावेळी आमदार अमित गोरखे,भीमराव केराम, तानाजी मुटकुळे, शाम खोंडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम, डॉ. प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव सुभाष नलावडे, अवर सचिव सीमा तांबे, कक्ष अधिकारी राहुल लिंगरवार, समिती प्रमुख यांचे स्वीय सहाय्यक रणजित गमरे, सहाय्यक कक्ष…
9 ऑक्टोबरला राज्यव्यापी रिक्षा, टॅक्सी व कॅब बंदचा इशारा – टू-व्हीलर टॅक्सी विरोधात संघटनांचा एल्गार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरात 9 ऑक्टोबर 2025 रोजी रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांकडून एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त कृती समितीने हे आंदोलन पुकारले असून, टू-व्हीलर टॅक्सी सेवेच्या विरोधात सरकारला इशारा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रात सुमारे 20 लाख रिक्षा चालक-मालक आणि 7 लाखांहून अधिक टॅक्सी-कॅब चालक असूनही या घटकांवर सातत्याने अन्याय होत आहे. एक लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली जात आहे, ज्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गदा येत आहे. नवीन रोजगाराच्या नावाखाली ज्यांना पूर्वी परवाने दिले गेले, त्यांना बेरोजगार करण्याचे…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढचा टप्पा सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांमध्ये पार पडला. या भेटीदरम्यान आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जागेची अडचण दूर करून घंटागाडीची मागणी, इंदोरी–जांबवडे रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, प्रधानमंत्री आवास योजनेत राहिलेल्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा, प्रस्तावित रेल्वे लाईनसंदर्भात शेतकऱ्यांच्या शंका व भूमिका, रेशनिंगमधील अडचणी, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांमधील अडथळे व वाढीव कामाची मागणी, लाडकी बहीण व संजय गांधी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. शिवसेना एक परिवार आहे. त्यामुळे कोणीही गटबाजी करु नये, सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटिकापदी शिला भोंडवे, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती केली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते…
पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित *श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम…….* *”लिहिते व्हा…”*…. *मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग* *भाग क्रमांक :- ७* *बुधवार, दिनांक : १७ सप्टेंबर २०२५* *प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे* *संत कान्होपात्रा* शुद्ध नाही याती | तरी शुद्ध भक्ती | देहाची विरक्ती | जागलीसे || विशुद्ध अंतरी | निर्मळ भावांनी | शोभे कमलिनी | कंदर्पात || ऐशी कान्होपात्रा | गणिकेच्या घरी | लावण्य सुंदरी | जन्मा आली || मृत्तिके समान | धनाचिया राशी | जावे पंढरीसी | हाच ध्यास || निघाली सोडून | माया मोहपाश | श्रीहरीची आस | एक मात्र || अभेद भक्तिने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यू-डायस (UDISE+) च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बहुतांश महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावरून या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस अधिक सुधारत असल्याचे चित्र आहे. तसेच या शाळांच्या स्वतंत्र मूल्यमापनात शैक्षणिक निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. यू-डायसच्या आकडेवारीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४८ हजार १५३ इतकी असलेली प्रवेशसंख्या वर्ष २०२३-२४ मध्ये ५० हजार ५८१, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५० हजार ७४९ वर पोहोचली आहे. तर चालू शैक्षणिक वर्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2022…
