प्रतिभा ज्युनिअर कॉलेज “इंडियन स्कूल एक्सलन्स अवार्ड”ने सन्मानित

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज ला तन्मय पब्लिकेशन आणि सप्तरंग सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडियन स्कूल एक्सलन्स अवार्ड” पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाशी असलेले योगदान यासाठी या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
या पुरस्कारामुळे प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची ची शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत झाली असून संस्थेच्या शिक्षणाच्या दर्जात सातत्याने सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे. महाविद्यालयाने नवोन्मेषी शिक्षण पद्धती, डिजिटल शिक्षण साधने, कौशल्यविकास कार्यशाळा आणि सामाजिक उपक्रम यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी यापुढेही समृद्ध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की,” हा देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार असून , हा पुरस्कार संस्थेबरोबर संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, समर्पण आणि नवनवीन कल्पनांचा अवलंब करून आम्ही पुढेही उत्कृष्ट कामगिरी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ . दीपक शहा, खजीनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ. तेजल शहा , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरीया आदीच्या मार्गदर्शनाखाली करत राहू.” प्रतिभा ज्यूनिअर कॉलेज महाविद्यालयाला हा पुरस्कार मिळाल्यावर संस्थेचे प्राध्यापक प्राचार्या व शिक्षक वृंदाचे कौतुक केले.













