Author: maharashtrabreakingnews.com

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीकडून ६ गुन्हे उघडकीस आणले असून २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी, दापोडी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, भोसरी, दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक- एक घरफोडी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सराईत गुन्हेगार जयंत याच्यावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत. इतर ५३ गुन्हे दाखल असून त्याचा…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवरात्र उत्सवानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात यंदा देखील भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या संकल्पनेतून आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने हा उत्सव पार पडणार असून, स्थानिकांसाठी आनंदाचा आणि स्नेहाचा मेळा ठरणार आहे. हा महोत्सव २६, २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई लेन, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आला आहे. दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक डान्स परफॉर्मन्सेस आणि विशेष पारंपरिक डांडिया राउंड्समुळे उत्सवाला रंगत येणार आहे. स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय देखील करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहभागी…

Read More

“रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उदयन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यमहोत्सवातून संधी मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहराची आता सांस्कृतिक ओळखही निर्माण झाली असून अनेक कवी, लेखक, साहित्यिक, अभिनेते घडले आणि घडत राहतील. यामुळे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. सरकार म्हणून सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्राला शक्यतो सर्व मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या महोत्सवाला मदत करून कला, संस्कृती जोपासण्यास हातभार लावला आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १९ वर्षाखालील गटात ॲक्रोबॅटिक स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत ११ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई केली आहे.      पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय  ॲक्रोबॅटिक स्पर्धा २०२५ – २६ (दि. १३) निगडी येथील एलाइट फिटनेस अकॅडमी  येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.       या स्पर्धेत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विविध गटातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. यामध्ये मुलींच्या संघात इयत्ता ६…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आयुष्यात प्रयत्न केले तरच समोर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करून यश संपादन करता येईल. अन्यथा अनेक संधी हातून सुटून जातील. समोर आलेले आव्हान आपल्याला सिध्द करण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधी आहे, असा विचार करून बारकाईने अभ्यास करत संधीचे सोने करा, असे मार्गदर्शन टाटा इव्हीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अश्विनी मट्टू यांनी विद्यार्थ्यांना केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या २०२५-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ – २०२५’ या कार्यक्रमाद्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी मट्टू यांनी ‘लिडरशीप इन ए चेंजिंग वल्ड’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या मधील उच्च शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वाचा टप्पा असल्याचे दक्षिण कोरिया येथील सोगांग विद्यापीठाचे उपाध्यक्ष, संशोधन कार्य व उपसंचालक प्रा. ली क्यू-ताई यांनी सांगितले..     ग्लोबल कोरियन स्टडीज विभाग अधिष्ठाता प्रो. किम डॉन्ग ताएक, यांनी सांगीतले की, या करारामुळे संस्कृती आधारित शिक्षण व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या नव्या वाटा खुल्या होतील.      पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) जागतिक शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दक्षिण कोरियातील सोगांग विद्यापीठासोबत पीसीयूच्या कॅम्पस मध्ये सामंजस्य करार केला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला दापोडी शून्य कचरा प्रकल्प हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून महिलांचे सबलीकरण, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम ठरत आहे. या प्रकल्पासाठी दररोज कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा प्रकल्प महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. घरगुती कचऱ्याचे संकलन केल्यानंतर तो वर्गीकृत करून त्याद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी येथे व्यवस्थित घेतली जात आहे. या महिलांना आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक त्या सोयीसुविधा…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव दापोडी येथे पांरपारिक पध्दतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. पांरपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली. पिंपळे गुरव चे  ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरा पासुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत पिंपळे गुरव मधील गावकरी जगताप, काटे, पाटील,देवकर,पाटील आदी गावकरी यांनी आपल्या बैलजोडीनी सहभाग घेतला होता. विलास विलास तात्या जगताप प्रगतशील शेतकरी यांच्या मातोश्री झामाबाई काळुराम जगताप या सहकुटुंब  यात तीन मुले तीन सुना सात नातवंडे दोन मुली एक नातसून तीन नाती सहा पथरुंडे असं एकत्रित कुटुंब  साठ वर्षापासून बैल जोडीची…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीत पांरपारिक पध्दतीने बैलपोळा साजरा करण्यात आला बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली .पांरपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली .चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूकीत श्री गणेश किसन आप्पा यादव यांच्या बैलजोडी नी सहभाग घेतला कुदळवाडी चिखली येथील किसन आप्पा यादव यांच्या साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काडून बैल पोळा साजरा करत आहेत. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तर जनावरे पाळणे दूरच राहिले. आम्ही सर्जा राजाची जोडी फक्त हौसे खातर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी सकाळी ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘एक दौड मोदीजी के नाम’ या घोषणेने तरुणाईला एकत्र आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये तरुण-तरुणींसह विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, देशभक्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन येथून या मॅरेथॉनला सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. स्पर्धकांनी कोकणे चौकातून ८ टु ८० पार्कपर्यंतचा मार्ग उत्साहात पूर्ण केला. या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क आकारण्यात आला नव्हता, ज्यामुळे सर्वांसाठी हा एक खुला सोहळा बनला होता. मान्यवरांच्या हस्ते…

Read More