ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपळे गुरव दापोडी येथे पांरपारिक पध्दतीने बैलपोळा साजरा

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव दापोडी येथे पांरपारिक पध्दतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. पांरपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.
पिंपळे गुरव चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरा पासुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत पिंपळे गुरव मधील गावकरी जगताप, काटे, पाटील,देवकर,पाटील आदी गावकरी यांनी आपल्या बैलजोडीनी सहभाग घेतला होता.
विलास विलास तात्या जगताप प्रगतशील शेतकरी यांच्या मातोश्री झामाबाई काळुराम जगताप या सहकुटुंब यात तीन मुले तीन सुना सात नातवंडे दोन मुली एक नातसून तीन नाती सहा पथरुंडे असं एकत्रित कुटुंब साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काडून बैल पोळा साजरा करत आहेत. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत. नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तरीही आम्ही जनावरे पाळुन शेती व दुधाचा रतीब नागरिकांना देऊन आम्ही आज चौथी पिढीने आजही परंपरा चालु ठेवलेली आहे. चौथ्या पिढीमध्ये इंजिनियर डॉक्टर पदवीधर असूनही शेती व जनावरांची सेवा करणे चालू ठेवले आहे.नातवंडे व पथरुंड हि एरवी बैलांच्या पाठीवर बसुन खेळतात सर्जाराजा लहान मुलांना कुठलीही इजा करत नाही. सर्व कुटुंबातील सदस्य सर्जा राजाची वर्षभर काळजी घेतात आणि बैलपोळ्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो.पैलवान ग्रुप चे सदस्य निखिल जगताप व मित्रपरिवार यांनी तसेच सर्व पिंपळे गुरव दापोडी येथील गावकऱ्यांनी आपापल्या बैलजोडींची मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
दापोडी येथील ओंकार गुंजाळ यांनी शिवशंभो म्युझिक सिस्टीम च्या तालावर दापोडीतील तरुण वर्ग म्युझिक सिस्टिम च्या तालावरती नाचून बैलपोळा साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथे मध्ये बँड ढोल ताशा पथक यावर सर्व गावकरी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात बैलपोळा साजरा करण्यात आला













