पिंपळे सौदागरमध्ये रंगणार भव्य दांडिया महोत्सव
अनिता संदीप काटे यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय सांस्कृतिक जल्लोषाचे आयोजन

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवरात्र उत्सवानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात यंदा देखील भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या संकल्पनेतून आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने हा उत्सव पार पडणार असून, स्थानिकांसाठी आनंदाचा आणि स्नेहाचा मेळा ठरणार आहे.
हा महोत्सव २६, २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई लेन, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आला आहे. दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक डान्स परफॉर्मन्सेस आणि विशेष पारंपरिक डांडिया राउंड्समुळे उत्सवाला रंगत येणार आहे. स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय देखील करण्यात आली आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू असून, ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष QR कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आर. जे. अक्षय करणार असून, त्यांच्या खास शैलीमुळे वातावरण अधिक उत्साही होईल, अशी अपेक्षा आहे.
या निमित्ताने सौ. अनिताताई संदीप काटे यांनी सांगितले की, “दांडिया महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नसून समाजातील एकोप्याला बळकटी देणारा उत्सव आहे. पिंपळे सौदागर परिसरातील प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन नवरात्राचा आनंद द्विगुणित करावा.”
या महोत्सवाच्या आयोजनामुळे पिंपळे सौदागर परिसरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण होणार आहे. नागरिकांनी परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













