Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ बाणेर पुणे,व प्रयास आरोग्य गट डेक्कन यांच्यामार्फत साधना कन्या विद्यालय, गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर मधील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला यांची गर्भाशय मुखाचा कॅन्सर याची मोफत तपासणी करण्यात आली. दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशय कॅन्सर ने निधन पावत असल्याची माहिती या प्रकल्पाच्या नियोजक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ. रूपाली बेनाडे यांनी दिली. जगातील दोन नंबरला महिलांच्या बाबतीत गंभीर समजला जाणारा गर्भाशयाचा कॅन्सर याबाबत सर्व महिलांनी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे असे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील यांनी दिली. या कॅम्प करिता रोटरी क्लब चे सदस्य नाडकर सर,विलास शेटे सर यांचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघ च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड मूर्तिपूजक महासंघाच्या सहकार्याने निगडी प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ सभागृहात अतिशय मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आचार्य प पू अक्षयबोधीसूरीश्वरजी म सा, आचार्य प पू गुप्तिनंदजी म सा ,आचार्य प पू महाबोधीसूरीश्वरजी म सा तसेच साध्वीजी प पू स्नेहाश्रीजी म सा आणि प पू रत्नकीर्तीजी म सा मंचावर उपस्थित होत्या. यावेळी प्रवचन देताना परमपूज्य गुप्तीनंदी जी महाराज यांनी सामूहिक क्षमापनेचे महत्व विशद केले . आपल्या अपराधाबद्दल, चुकाबद्दल,इतरांचे मन दुखावले असेल तर क्षमायाचना करण्याचे निर्देश जैन धर्मशास्त्रामध्ये दिले आहेत .क्षमापना जीवनामध्ये…

Read More

वाकड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवरात्राच्या पारंपरिक जल्लोषात यंदा वाकड परिसरातील नागरिकांना महाराष्ट्राच्या लोककलेचा अनोखा ठसा अनुभवायला मिळणार आहे. विशाल  वाकडकर सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित नवरात्र दांडिया उत्सव 2025 मध्ये विशेष आकर्षण म्हणून युवा शाहीर चंद्रकांत माने यांचा “शाहिरी बाणा” हा थरारक लोककला कार्यक्रम गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सायं. 7 वाजता द्रौपदा लॉन्स, कस्तुरी चौक, वाकड येथे रंगणार आहे. शाहीर चंद्रकांत माने हे आपल्या दमदार आवाजासाठी, सामाजिक भान जपणाऱ्या आशयासाठी आणि ऊर्जावान सादरीकरणासाठी महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांच्या आख्यानांमध्ये सामाजिक जाणीव, प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठसा अनुभवायला मिळतो. त्यामुळे वाकडमधील हा कार्यक्रम स्थानिकांसाठी एक संस्मरणीय ठरणार आहे. याचबरोबर…

Read More

पिंपरी चिंचवड साहित्य मंच* आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम……. *”लिहिते व्हा…”*…. मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग भाग क्रमांक :- ८ वार : बुधवार दिनांक : २४ सप्टेंबर २०२५ प्रस्तुतकर्ता : माधुरी शिवाजी विधाटे *श्री संत मुक्ताबाई* मुक्ताई योगिनी | विश्वाची जननी | मना संजीवनी | देत असे || निवृत्ती सोपान | बंधू ज्ञानेशाचा | विश्व उद्धाराचा | घेई वसा || रुसला ज्ञानेश | जेव्हा जगावर | बोल बोधपर | परिसले || अभंग ताटीचे | झरे वात्सल्याचे| विश्वकल्याणाचे | मार्ग दावी || तापलेल्या मनी | उपदेश वाणी | अमृत शिंपणी | करीतसे || शिष्य चांगदेव |…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – कीर्ती मारुती जाधव युथ फाउंडेशन व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरात साकारण्यात आला.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा भव्य देखावा उभारला आहे. नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचे महत्वाचे व्रत आहे. देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते. भारतात एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. नवरात्रोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपीठांचे दर्शन सोहळा तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये अनुभवता येणार आहे. महात्मा फुले नगर चिखली रोड वरील कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने भव्य दिव्य असा देखावा सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी प्रतिभा ग्रुप ऑफ इान्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम व संस्थेशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे प्रा. रघुनाथ ताम्हाणे, प्रा. सुरेखा कुंभार , प्रा. तृप्ती बजाज व वरिष्ठ लिपिक भूषण महाजन यांना स्मृतीचिन्ह देत या पुरस्काराने सन्मानित करण्यात…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे “सस्टेनेबिलिटी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड डिझाईन” या विषयावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. थर्मॅक्स लि.चे इनोव्हेशन विभागाचे मुख्य डॉ. आर. एस. झा यांनी “बॉयलर डिझाईनमधील नवे ट्रेंड्स” या विषयावर मार्गदर्शन केले. बॉयलरची कार्यक्षमता शंभर टक्क्यांपेक्षा जास्त कशी वाढविता येऊ शकते, एच टू ओ गणितीय मॉडेलिंग व थर्मल सिस्टीम्सच्या सिम्युलेशनचा उपयोग, तसेच कंडेन्सिंग टेक्नॉलॉजी, लो-एनवोक्स बर्नर्स, व्हीओक्स, मल्टिपल हीट एक्स्चेंजर्स, टर्ब्युलेटर्स आणि व्हेअरेबल-प्रायमरी पायपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी झा यांनी सविस्तर माहिती दिली. द सॉल्ट सिस्टिम्सच्या संचालिका…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात संगीत रंगभूमीवरील विशेष योगदान व मराठी संगीत रंगभूमी या ग्रंथ निर्मितीच्या निमित्ताने डॉ. वंदना घांगुर्डे यांची प्रकट मुलाखत लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले यांनी घेतली. प्रास्ताविक प्रभाकर पवार, स्वागत संस्थेचे रंगकर्मी सतीश एकार यांनी केले. जेष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ, रमेश…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू वर्षासाठी मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरल्यास सामान्य करावर थेट चार टक्के सवलत मिळणार असून, हा लाभ घेण्यासाठी आता केवळ ७ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ज्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरला नाही, त्यांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के विलंब दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी त्वरित कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ ते २२ सप्टेंबर दरम्यान महापालिकेला ५९५ कोटी २४ लाख रुपयांचा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी व समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याच अनुषंगाने तृतीयपंथी घटकांना चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेला स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे तृतीयपंथी घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व…

Read More