वाकडमध्ये नवरात्र उत्सवात शाहीर चंद्रकांत माने यांचा “शाहिरी बाणा” अनुभवण्याची संधी!

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवरात्राच्या पारंपरिक जल्लोषात यंदा वाकड परिसरातील नागरिकांना महाराष्ट्राच्या लोककलेचा अनोखा ठसा अनुभवायला मिळणार आहे. विशाल वाकडकर सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित नवरात्र दांडिया उत्सव 2025 मध्ये विशेष आकर्षण म्हणून युवा शाहीर चंद्रकांत माने यांचा “शाहिरी बाणा” हा थरारक लोककला कार्यक्रम गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सायं. 7 वाजता द्रौपदा लॉन्स, कस्तुरी चौक, वाकड येथे रंगणार आहे.
शाहीर चंद्रकांत माने हे आपल्या दमदार आवाजासाठी, सामाजिक भान जपणाऱ्या आशयासाठी आणि ऊर्जावान सादरीकरणासाठी महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांच्या आख्यानांमध्ये सामाजिक जाणीव, प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठसा अनुभवायला मिळतो. त्यामुळे वाकडमधील हा कार्यक्रम स्थानिकांसाठी एक संस्मरणीय ठरणार आहे.
याचबरोबर नवरात्राच्या निमित्ताने पारंपरिक दांडिया व गरबा उत्सवाचाही नागरिकांना आस्वाद घेता येणार आहे.
नागरिकांसाठी आवाहन :
वाकड, पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी या अद्वितीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कुटुंबासह उपस्थित राहून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजक विशाल भाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
दिनांक : गुरुवार, 25 सप्टेंबर 2025
वेळ : सायं. 7 वाजता स्थळ : द्रौपदा लॉन्स, कस्तुरी चौक, वाकड
अधिक माहितीसाठी संपर्क : 📱 8235909090













