पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने आयोजित सामूहिक क्षमापना एवं मैत्री दिवस कार्यक्रम आचार्य आणि साधु साध्वींच्या सान्निध्यात मंगलमय वातावरणात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघ च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड मूर्तिपूजक महासंघाच्या सहकार्याने निगडी प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ सभागृहात अतिशय मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी आचार्य प पू अक्षयबोधीसूरीश्वरजी म सा, आचार्य प पू गुप्तिनंदजी म सा ,आचार्य प पू महाबोधीसूरीश्वरजी म सा तसेच साध्वीजी प पू स्नेहाश्रीजी म सा आणि प पू रत्नकीर्तीजी म सा मंचावर उपस्थित होत्या. यावेळी प्रवचन देताना परमपूज्य गुप्तीनंदी जी महाराज यांनी सामूहिक क्षमापनेचे महत्व विशद केले . आपल्या अपराधाबद्दल, चुकाबद्दल,इतरांचे मन दुखावले असेल तर क्षमायाचना करण्याचे निर्देश जैन धर्मशास्त्रामध्ये दिले आहेत .क्षमापना जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असते कारण एक दुसऱ्याला क्षमा केल्यानंतरच चांगले संबंध पुनर्स्थापित होतात.. जैन एकता ही काळाची गरज आहे. क्षमा करणे आणि क्षमा मागणे याला विशेष महत्त्व जैन धर्मशास्त्रामध्ये आहे यानिमित्ताने जैन महासंघाच्या वतीने जैन समाजाच्या एकीचे दर्शन घडवले आणि हा उपक्रम महासंघाच्या वतीने गेल्या अनेक वर्ष आयोजित केला जातो त्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया आणि त्यांचे सर्व पदाधिकारी ,सहकारी यांना त्यांनी धन्यवाद दिले .साधुवाद दिले .जैन एकतेसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आणि कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अहिंसा म्हणजे कायरता नाही तर हिंसा करणार्या व्यक्तिला हिंसेपासुन परावृत्त करणे ही सुध्दा अहिंसा आहे. आचार्य प पू अक्षयबोधीसुरीश्वरजी , आचार्य प पू महाबोधीसुरीश्वरजी म सा आणि प पू स्नेहाश्रीजी म सा यांनीही क्षमापनाचे महत्व विशद केले आणि समाजावर आलेल्या
संकटाच्या वेळी , अन्यायकारक निर्णयाविरोधात सर्व जैनांनी यापुर्वीप्रमाणे यापुढेही एकत्रितपणे लढा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले,स्वागत महामंत्री संदीप फुलफगर यांनी केले तर क्षमापना संकल्प वाचन पूर्व अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले ,या वेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा,विलास पगारिया, प्रा प्रकाश कटारिया, सुर्यकांत मुथियान, विरेंद्र जैन हे हजर होते , कार्यक्रमासाठी विरेश छाजेड ,श्रेणिक मंडलेचा , केतुल सोनिग्रा, कार्याध्यक्ष विजय भिलवडे , नेणसुखजी मांडोत, तुषार मुथा, स्नेहल भंडारी आदिंनी परिश्रम घेतले













