साधना कन्या विद्यालयात महिला शिक्षिका यांची मोफत गर्भाशय कॅन्सर तपासणी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ बाणेर पुणे,व प्रयास आरोग्य गट डेक्कन यांच्यामार्फत साधना कन्या विद्यालय, गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर मधील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला यांची गर्भाशय मुखाचा कॅन्सर याची मोफत तपासणी करण्यात आली. दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशय कॅन्सर ने निधन पावत असल्याची माहिती या प्रकल्पाच्या नियोजक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ. रूपाली बेनाडे यांनी दिली. जगातील दोन नंबरला महिलांच्या बाबतीत गंभीर समजला जाणारा गर्भाशयाचा कॅन्सर याबाबत सर्व महिलांनी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे असे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील यांनी दिली.
या कॅम्प करिता रोटरी क्लब चे सदस्य नाडकर सर,विलास शेटे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयातील अनुराधा गेजगे, मनीषा मासाळ, सुप्रिया लाटकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही केली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील पर्यवेक्षिका मंदाकिनी शिंदे तृप्ती पाटील, पौर्णिमा सावंत उपमुख्याध्यापक श्री.आनंदराव करे सर यांच्या मार्गदर्शनाने शिबिर उत्तमरीत्या पार पडले.













