Author: maharashtrabreakingnews.com

नाशिक, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील इंदिरा युनिव्हर्सिटी आयोजित ‘इंदिरा युथ यात्रा आणि लिडरशिप अवॉर्ड २०२६’ या सोहळ्यात नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान होणार आहे. यासह विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध सिने कलाकारांशीही थेट संवाद साधता येणार आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा सोहळा शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत “ताज गेटवे नाशिक” येथे होणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच नेतृत्व विकासासाठी दिशा देणे हा आहे. इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांची उपस्थिती असून त्या युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – CBSE इयत्ता दहावी (२०२५–२६) चा निकाल जाहीर झाला असून पिंपळे सौदागर येथील Challenger Public School ने यंदा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. या परीक्षेत प्रेक्षा रथ हिने ९७.८% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर सौम्या सवई हिने ९७.६% आणि कनक राय हिने ९७.४% गुण मिळवत अव्वल यादीत स्थान मिळवले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उच्च टक्केवारी मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे. चिन्मयी एम (९७%), तन्वी कोहळे (९५.४%), निमिष काळे (९५%), दिशा किवांडे (९४%), अक्षीत तिवारी (९३%) आणि अक्षीत गुप्ता (९२.६%) या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट गुण…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – प्रबुद्ध विचार मंच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली आयोजित संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले अशा थोर महापुरुषांना मानवंदना देण्यात आली. प्रबोधनात्मक कार्यक्रम, कलासादरीकरण, महिलांचा लक्षणीय सहभाग, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे बाबासाहेबांचे अफाट पुस्तक प्रेम अधोरेखित करणारे भव्य पुस्तक प्रदर्शन व सायंकाळी रोषणाईने सजलेल्या रथामधून महापुरुषांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अशा वैविध्यपूर्ण व भरगच्च कार्यक्रमांनी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. ‘मॅनहॅटन कम्युनिटी हॉल’ येथील पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. विशाल घोरपडे यांनी केले. प्रबोधन, राजकारण, इतिहास, क्रीडा,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना आज (गुरुवारी) महापालिका सेवेतून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश दिले होते. खोराटे यांना कार्यमुक्त केल्याने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले सनदी अधिकारी (आयएएस) कुलदीप जंगम यांचा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ वर्गामध्ये आहे. नवीन आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. सद्या मुख्याधिकारी संवर्गातील विजय खोराटे, तृप्ती सांडभोर आणि ग्रामविकास विभागाचे विक्रांत बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. त्यातील खोराटे यांचा…

Read More

आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत योग्य काळजी घेतल्यास उष्माघातासारख्या गंभीर आजारापासून बचाव करता येऊ शकतो. उष्माघात ही एक गंभीर आरोग्य समस्या असून शरीराचे तापमान अत्यंत वाढल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ होणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या…

Read More

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आम आदमी पार्टीने पिंपरी चिंचवड शहरात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि शहरातील नागरिकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून वैजनाथ शिरसाट यांची ‘आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.    वैजनाथ शिरसाट यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, जनसंपर्क आणि राजकारणात मध्ये असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात शहरात सुशिक्षित बेरोजगार, पाणी प्रश्न,  विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे  मोफत शिक्षण, आणि दिल्ली व पंजाब चे मॉडेल ,  पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे व संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.  यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व प्रशासनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेषतः झोपडपट्टी व दाट वस्ती भागांमध्ये गटर करणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे,…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांनी  समाजातल्या सर्व घटकांच्या उद्धाराचे कार्य केले. महापुरुषांना जाती पातीच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. त्यांच्यातील सामान्यत्वाला बाजूला काढून असमान्यत्वाचा वेध घेतला पाहिजे. अराजकाच्या पार्श्वभूमीवर जगात शांतता, सात्विकता जोपासत विश्वसंस्कृती, विश्वबंधुत्व, विश्वमानवता वाढली पाहिजे. महापुरुषांच्या जीवनाचा सार आपल्यामध्ये बिंबवत त्यांच्या पुण्याईची बेरीज झाली पाहिजे.” असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत  साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.       चिखली येथील कॉनक्वेस्ट महाविद्यालयामध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे प्रथम सत्र गुंफताना ” शिव -फुले- शाहू -आंबेडकर: एक सामाजिक विचार” या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील मुंबई–बंगळुरू महामार्गावरील वाकड ब्रिजखालील परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अनियमित थांबणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  विशाल शंकर वाकडकर यांनी वाकड वाहतूक पोलीस विभागाकडे लेखी निवेदन देत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाकड ब्रिजखालील हा परिसर शहरातील अत्यंत वर्दळीचा असून, येथे सतत वाहनांची मोठी ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी रस्त्याच्या कडेला तसेच अनेक वेळा रस्त्याच्या मधोमधच वाहने उभी करत आहेत. या अनियंत्रित थांबणीमुळे रस्त्यावर अनावश्यक अडथळे…

Read More

​थेरगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्याने ही शहराचे वैभव असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम करत असतात. याच पार्श्वभूमीवर थेरगाव प्रभाग क्रमांक २३ येथे साकारण्यात येत असलेल्या निसर्गरम्य ‘बटरफ्लाय गार्डन’च्या कामाची पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता या उद्यानाच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. ​या पाहणी दौऱ्यादरम्यान सभापती अभिषेक बारणे यांनी नागरिकांसाठी हे उद्यान अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त व्हावे या दृष्टीने अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय…

Read More