Author: maharashtrabreakingnews.com

नाशिकमध्ये सिनेकलाकारांच्या उपस्थित इंदिरा युथ यात्रा अँड लीडरशिप अवॉर्ड्स सोहळा संपन्न नाशिक,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देऊ नका. फक्त सकारात्मक लोकच आपल्या आसपास ठेवा. आयुष्याकडे पाहण्याचा अॅप्रोच बदलताच प्रोसेस देखील आपोआप बदलेल,चांगल्या संगतीत रहा ही चांगली संगत तुमच्या आयुष्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमचे खरे बेस्ट फ्रेंड्स म्हणजे तुमचे आई-वडील आहेत. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला असा सल्ला अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटी आयोजित शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानासाठी शुक्रवारी (ता. १७) नाशिकच्या ताज गेटवेमध्ये इंदिरा युथ यात्रा अँड लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षात विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, सक्रिय युवा कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडली. यमुनानगर, निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दीर्घकाळ संघटनात्मक काम केलेल्या कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क निर्माण केला आहे. शाखास्तरापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि युवकांमधील प्रभावाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर आदित्य कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न अखेर सुटणार की पुन्हा पुढे ढकलला जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून नावे निश्चित करण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. मात्र, येत्या सोमवारी (२० एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली होती. जुने-नवे कार्यकर्ते, आमदार समर्थक आणि निष्ठावंत गट यांच्यातील समतोल साधताना भाजप नेतृत्वाला मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे अनेक दिवस या प्रक्रियेला विलंब झाला. दरम्यान, पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नावे आधीच जाहीर झाली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र निर्णय लांबला होता. शहरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांनी नागरिकांना स्त्री-पुरुष समानतेबरोबरच एकात्मता, बंधुता, अहिंसा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याची समान संधी मिळावी त्यात कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये याकरिता सतत कार्यरत असणारे महात्मा बसवेश्वर यांच्या व्यापक विचारसरणीचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्यील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमास कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘NCMC कार्ड’ सेवेचा लाभ ज्येष्ठ नागरिक व महिलांना सुलभ व्हावा, यासाठी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेत समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे. किवळे-रावेत परिसरातील आदर्श नगर येथील विरंगुळा केंद्रात थेट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एसटी बस स्थानकांवर जाऊन रांगेत उभे राहणे, वारंवार फेऱ्या मारणे यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन संघाने अधिकृत एजंटच्या माध्यमातून ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली. आतापर्यंत सुमारे २७५ ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या सेवेचा लाभ घेतला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार चळवळीतील एक प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते केशव घोळवे यांचे नाव सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी कामगार संघटनांकडून पुढे येत आहे. अत्यंत साध्या आणि संघर्षमय जीवनातून पुढे आलेल्या घोळवे यांनी उसतोड मजूर कुटुंबातून आपली वाटचाल सुरू केली. शिक्षणासाठी विविध कामे करत त्यांनी आयटीआयपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि औद्योगिक क्षेत्रात वेल्डर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर थरमॅक्समध्ये कायम नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी वारशाचा जागर करत, “शिवचरित्र प्रसार अभियान” अंतर्गत स्वराज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्यांची प्रेरणादायी अश्वारोहण मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण परिसरातून ही मोहीम सुरू होणार असून, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट आणि दिग्विजय प्रतिष्ठानच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली आहे.  संस्कृती, स्वातंत्र्य, स्वराज्य आणि समृद्धी या मूल्यांची सांगड घालत, या उपक्रमाचा उद्देश इतिहास, परंपरा आणि अश्वविद्या यांचा संगम साधून समाजात स्वाभिमान जागवणे व नव्या पिढीला प्रेरणा देणे हा आहे. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत सहभागी घोडेस्वार पुढील काही दिवसांत स्वराज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्यांना भेट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वातावरणात उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला असून, तापमानाची नोंद 40 अंश सेल्सिअस झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत आहे. नागरिकांना उकाड्यातून काही दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  तापमानाने उच्चांक गाठला असून, शहरात 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेले आठ दिवसांपासून तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतेमुळे तापमानात वाढ होऊन अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, चक्कर, मळमळ आणि उलटीचे त्रास जाणवत आहेत. उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी, छत्री, गॉगल घेतले तरी उन्हाचे चटके जाणवत आहेत. शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट जाणवत आहे. वाढलेल्या तापमानामुळे…

Read More

“समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर” प्रकल्पास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आयआयटी मुंबई यांच्या वतीने “युरेका” ही नव संकल्पना आणि स्टार्टअप प्रकल्प सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील वेदांत ऋतुराज बलकवडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या “समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर” (‘ओशन वेस्ट रिसायकलिंग’) या नावीन्यपूर्ण प्रकल्पास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.     “युरेका” या आशियातील सर्वात मोठ्या नव संकल्पना आणि स्टार्टअप प्रकल्प सादरीकरण कार्यशाळेत देशभरातून एकूण ४३,००० प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी अंतिम फेरीत ८० प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये बलकवडे यांच्या “समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर” (‘ओशन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता मकरंद निकम (सिव्हिल/व्हीआरएस) यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नगरसेवक श्री. विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. निविदा प्रक्रिया, विकासकामे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. नढे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मकरंद निकम यांनी शहर अभियंता पदावर कार्यरत असताना घेतलेल्या अनेक तांत्रिक निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. विशेषतः निविदा प्रक्रियेत काही ठराविक कंत्राटदारांना लाभ होईल अशा अटींचा समावेश करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, विविध विकासकामांच्या मोजमाप पुस्तके (Measurement Books) आणि देयक व्हाउचर्स…

Read More