नाशिकमध्ये सिनेकलाकारांच्या उपस्थित इंदिरा युथ यात्रा अँड लीडरशिप अवॉर्ड्स सोहळा संपन्न
नाशिक,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देऊ नका. फक्त सकारात्मक लोकच आपल्या आसपास ठेवा. आयुष्याकडे पाहण्याचा अॅप्रोच बदलताच प्रोसेस देखील आपोआप बदलेल,चांगल्या संगतीत रहा ही चांगली संगत तुमच्या आयुष्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमचे खरे बेस्ट फ्रेंड्स म्हणजे तुमचे आई-वडील आहेत. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला असा सल्ला अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटी आयोजित शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानासाठी शुक्रवारी (ता. १७) नाशिकच्या ताज गेटवेमध्ये इंदिरा युथ यात्रा अँड लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांच्यासह लोकप्रिय
मराठी कलाकार अमेय वाघ, नम्रता संभेराव, कुलगुरू डॉ. अनघा जोशी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस व नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे आदी विशेष मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांशी मुक्त संवाद साधला.
शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, संचालक बाबासाहेब जाधवराव, शार्दूल गांगल, साहिल मेहंदळे, प्राचार्य डॉ.जनार्दन पवार, डॉ. शिखा सिंधू, डॉ. दयानंद कन्नूर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदिरा युनिव्हर्सिटीने आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि उल्लेखनीय करिअर यशाबद्दल तसेच मराठी सिनेसृष्टीत दर्जेदार काम करणारे अभिनेते अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव आणि नम्रता संभेराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. आशुतोष मिसाळ, डॉ. अंजली काळकर यांनी सूत्रसंचालन केले.
शिक्षण क्षेत्र म्हणजे राष्ट्र निर्मितीचे पवित्र काम : डॉ. तरिता शंकर
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कलाकारांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवास, आलेल्या अडचणी, गाठलेले यशाचे टप्पे आणि करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, भारत हा देणारा देश आहे, म्हणूनच मी कधीही परदेशात संस्था सुरू करण्याचा विचार केला नाही. हे राष्ट्रनिर्मितीच पवित्र काम आहे. आयुष्यात आपला उद्देश शोधा, त्याला धरून पुढे जा. आयुष्यात चढ-उतार येतच राहतात, मोठी स्वप्ने बघणे थांबवू नका. अमेय वाघ म्हणाला शेतकरी, जवान आणि शिक्षक हेच खरे रोल मॉडेल आहेत. समाजाने त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहावं. नम्रता संभेराव म्हणाली, आत्मविश्वास ढळू देऊ नका प्रत्येक संकटाला धिराने सामोरे जा.
या मान्यवरांचा झाला सन्मान
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात दिर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. कल्पना अहिरे, डॉ. विजयप्रसाद अवस्थी, डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. बापू जगदाळे, डॉ. मधुकर शेलार, प्रा. प्रकाश कडवे, डॉ. ऍड. इन. भगवान इलामामे, मधुरा शेलार, प्रकाश वैशंपायन सी.ए. समीर तोतले, डॉ. शेफाली भुजबळ, आशुतोष अमृते, डॉ. संतोष तांबे, डॉ. किशोर भालेराव, प्राचार्य एम.आर धामणे या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांना ‘एक्सेम्प्लरी लीडरशिप अवॉर्ड देऊन तसेच नाशिकच्या माध्यम प्रतिनिधीना व इंदिराच्या नाशिकमधील प्रथितयश १२ माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

