- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने देशभरातील युवा संशोधकांचा मेळा रंगणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील २४ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ज्यात, ते भारत सरकारचे रक्षा, विज्ञान मंत्रालय आणि एआयसीटीई समोरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. प्रत्येक समस्येच्या विजेत्यास ₹१.५ लक्षचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ८ डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, टीसीएस फाऊंडेशनचे संचालक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ या नि:शुल्क असलेल्या दोन अंकी विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी मनमुराद हसत उत्स्फूर्त दाद दिली. शुक्रवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे या नाट्यप्रयोगाला माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, अनुप मोरे, सरिता साने, अतुल इनामदार, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘करून गेलो गाव’ या धमाल विनोदी दोन अंकी नाटकात सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम हे ‘अण्णा’ या मध्यवर्ती भूमिकेत सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जसे अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा ज्वलंत सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करणार आहेत. पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कामगिरीने राज्य विधानपरिषदेत वेगळी छाप उमटवली होती. शहरातील शासकीय कर्मचारी, महापालिका, तसेच YCM रुग्णालयातील सुविधांचा अभाव, प्रलंबित योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक अडचणी, महिला सुरक्षेचे मुद्दे, क्रीडाविकास, तसेच युवांसाठी आवश्यक असलेली भविष्योन्मुख युवा धोरण असे अनेक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणांचे रूपांतर करण्यासाठी हाती घेतलेल्या टाकाऊ वस्तूंच्या कलात्मक पुनर्वापर उपक्रमामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. भोसरी प्रभाग क्रमांक ०७ भारत गॅस एजन्सी नजीक, विकास कॉलनीतील जागेचे सौंदर्यीकरण नुकतेच करण्यात आले असून, ही कलाकृती स्थानिक नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहा.आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली “वेस्ट टू आर्ट” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इ क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ०७ अंतर्गत इ क्षेत्रीय कार्यालयाने राबवलेल्या या उपक्रमात जुने टायर, फाटलेली…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवडवासीयांसाठी आणि एकूणच समस्त गणेशभक्तांसाठी दैवत असणाऱ्या महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाला काल मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवसाची सेवा सुगम संगीताच्या रूपाने स्थानिक पण आपल्या दैवी देणगीने नावारूपाला आलेल्या संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले या गायक जोडीने आपल्या सुश्राव्य गायनाने रसिकांना मनमुराद आनंद देत मोरया चरणी रुजू केली कालच्या या संगीत रजनीसाठी पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, केशव विद्वांस हे आणि रसिक तसेच यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थित होते. मराठी आणि हिंदी अशा मिश्र गाण्यांची मेजवानी रसिकांना पहिल्याच दिवशी…
मतदार संघातील 12 प्रभागांत एकाच वेळी प्रभाग कमिटीच्या बैठका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा ‘ऑन फायर मोड’ वर आहे. पक्षाकडून इच्छुक अर्ज वितरण सुरू झाल्यानंतर आज एकाच वेळी मतदार संघातील 12 प्रभागांमध्ये पक्षाचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग कमिटीची बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे, कमिटी सदस्यांकडून उमेदवार कोण असावा? याबाबत गोपनीय अभिप्राय घेतले आहेत. त्यामुळे भाजपाचे सक्रीय कार्यकर्तेच महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार ठरवतील, असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका…
– शहरात ‘‘लार्जर दॅन पार्टी’’ भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरण करण्याची प्रक्रिया करण्यात आली. आज शेवटच्या दिशवी 650 हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. विशेष म्हणजे, पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीसुद्धा पक्षाच्या शिष्टाचाराप्रमाणे (प्रोटोकॉल) स्वत: इच्छुक असल्याचा अर्ज घेतला आहे. ‘राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन् शेवटी स्वत:’’ हा पक्षाचे धोरण आपल्या कृतीमधून अधोरेखित केले आहे. महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना झाली. त्यानंतर आरक्षण सोडत झाली. भाजपा नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच शहरात आढावा बैठक घेतली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटीचे पदाधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा परिसरातील रावेत येथील चंद्रभागा कॉर्नर येथे नवीन रावेत उप डाकघर पोस्टचे दिमाखदार उद्घाटन आज, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. हा उपक्रम रावेत, किवळे, आदर्शनगर परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि सुविधा केंद्रित पाऊल म्हणून पाहिला जात आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन रावेत उप- डाकघर यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक सुविधा अधिक सुलभ होणार आहेत. उद्घाटनानंतर बोलताना आमदार शंकर जगताप यांनी ‘जनसेवा’ या संकल्पनेवर जोर दिला. ते म्हणाले, ”जनसेवेचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा आपण समाजाला सुविधा, विश्वास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दि. सेवा विकास कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पिंपरी मध्ये २०२१ नंतर सुरू झालेल्या प्रशासकीय घोटाळ्यांमुळे बँकेवर मोठे संकट ओढावले होते. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून बँकेच्या सभासदांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सभासद, खातेधारक, कर्मचारी व ठेवीदार यांच्या वतीने रिजर्व बँकेने रद्द केलेला परवाना पुन्हा सुरु करावा, बँक पूर्ववत सुरु करणे, तीन वर्षांचे थकीत वेतन देवून कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेणे, ठेवीदार व खातेदार यांचे पैसे परत करणे इत्यादी विषयांवर हीं सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० या वेळेत संत तुकाराम महाराज…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे “महापरिनिर्वान दिन” साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सचिन कळसाईत म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, युगपुरुष, घटनापती, महाविद्वान, दलितांचे कैवारी, स्त्री उद्धारक होते. माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, असे बाबासाहेबांचे शब्द आहेत. “…
