ताज्या घडामोडीपिंपरी

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा

Spread the love

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे “महापरिनिर्वान दिन” साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार  व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सचिन कळसाईत म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, युगपुरुष, घटनापती, महाविद्वान, दलितांचे कैवारी, स्त्री उद्धारक होते. माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, असे बाबासाहेबांचे शब्द आहेत. ”

सहशिक्षिक चेतना देशमुख, वैभवी जाधव, मनोरमा पाल  यांनी आपले इंग्रजी मराठी-हिंदी मध्ये मनोगत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनिता रोडे यांनी केले व आभार समृद्धी वाघमारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button