Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी चिंचवडमधील अनेक मातब्बर भाजपात डेरेदाखल निवडणुकीपूर्वीच अनेक मातब्बर नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा विजयी शंखनाद पिंपरी चिंचवडच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील- शंकर जगताप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची नेत्रदीपक प्रगती होत असून मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू आहे. या विकासप्रवासात शहरातील लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्षे शहराची सेवा करणाऱ्या विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांच्या माध्यमातून शहरविकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आज सर्वपक्षीय 22 दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला. महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. शहरात राजकीय दिवाळी सुरू झाली असून, अजित पवारांनी वाजवल्या ‘टिकल्या’; तर महेश लांडगेंनी ‘सुतळी बॉम्ब’ लावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक ‘‘पिंपरी-चिंचवडचा दादा विरुद्ध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून घेतल्यानंतर, याला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पक्षाने मुंबईत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात राष्ट्रवादी, उबाठा गट व इतर पक्षांतील तब्बल २२ दिग्गज नेत्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प वाटिका येथे उभारण्यात आलेल्या सामुदायिक कंपोस्टिंग केंद्रास महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरात विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली शहरात स्वच्छतेविषयक विविध अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुलाब पुष्प वाटिका येथे सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र स्वर्णलता मदरसन ट्रस्ट आणि इंडियन पॉल्यूशन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निवृत्तीवेतन ही केवळ आर्थिक तरतूद नसून सेवानिवृत्त व्यक्तींच्या दीर्घ सेवाभावाचा,त्यागाचा आणि योगदानाचा सन्मान आहे. निवृत्त वेतनधारकांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे आणि संवाद ठेवावा असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि पिंपरी चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिन (पेन्शनर्स डे) निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पुणे जिल्हा कोषागार भवनाचे कोषागार अधिकारी देवराम शेळके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह हास्यसम्राट…

Read More

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड येथील स्थानिक नेते राहुल कलाटे व अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाला तीव्र विरोध व्यक्त करण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष चेतन भुजबळ, महिला मोर्च्याच्या प्रदेश पदाधिकारी भारती विनोदे, राहुल काटे, नवनाथ ढवळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक २५ मधून पक्षाच्या धोरणाविरोधात बंडखोरी करण्याच्या भूमिकेत ते असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परिषदेत ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपली भूमिका मांडून कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून आयाराम ग्यारामाना प्राथमिकता देणं…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, वाघेरे पाटील यांचा लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या राजीनाम्यात संजोग वाघेरे पाटील यांनी नमूद केले आहे की, “काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे सध्या मी माझ्यावर सोपवण्यात आलेली संपूर्ण जबाबदारी अपेक्षेप्रमाणे…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ समितीचे माजी सदस्य शिरीष विश्रामराव जाधव (वय ७३ वर्षे) यांचे बुधवारी (दि.१६) निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी शिरीष जाधव यांची ओळख होती. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, तेंव्हा पासून शेवटपर्यंत जाधव यांनी पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस म्हणून पक्षाचे काम पाहिले. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी २०१२ ते २०१७ या काळात पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण मंडळ समिती सदस्यपदी त्यांची निवड केली होती. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक भाऊ आणि एक विवाहित बहिण असा परिवार आहे. ——————————

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील प्रभाग क्र.२० हा प्रभाग पिंपरी चिंचवडमधील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मतदार संघ आहे.या प्रभागातून अनेक विविध प्रस्थापित पक्षांकडून अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.परंतू अशा मातब्बर प्रस्थापितांच्या भाऊ गर्दीत या प्रभागातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून  वैजयंती संदीप ढेरंगे/राक्षे यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.आतापर्यंत निवडूण आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी प्रभागातला कुठला प्रश्न मार्गी न लावल्यामुळे या मतदार संघातील जनतेला आता बदल हवा आहे.म्हणुन येणा-या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदार संघातील जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून विविध सामाजिक संघटनेकडून सर्वाधिक सौ वैजयंती संदीप ढेरंगे यांना पाठींबा मिळत आहे.त्याच धर्तीवर भारतीय दलित पँथर या सामाजिक संघटनेनेही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीला वेग आला असतानाच, बुधवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर येथील सिद्धिविनायक मंदिरात एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका महेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जनसमर्थनाच्या वातावरणात पार पडला. या शुभारंभाने प्रभागातील राजकीय हालचालींना नवे बळ मिळाले आहे. भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निलेश नेवाळे यांच्या शुभहस्ते श्रीचरणी नारळ फोडून प्रचाराची मंगल सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रभागातून भव्य, शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान “सारिका तुम आगे बढो”, “महिला नेतृत्वाचा जयघोष” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीमध्ये…

Read More